25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरअर्थजगतरिलायन्सच्या बोर्डात आता इशा, आकाश, अनंत अंबानी

रिलायन्सच्या बोर्डात आता इशा, आकाश, अनंत अंबानी

नीता अंबानी होणार पायउतार

Google News Follow

Related

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) नुकतीच पार पडली असून यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मोठे बदल करण्यात आले आहेत. आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांना या मंडळात स्थान देण्यात आले असून त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार असून त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहणार आहेत.

गतवर्षी आकाश अंबानी यांना भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष बनवण्यात आले होते. मुकेश अंबानी अजूनही जिओचे चेअरमन आणि रिलायन्स जिओचे मालक आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या चेअरपर्सन आहेत आणि अनंत अंबानी एनर्जी बिझनेस सांभाळत आहेत.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या १० वर्षांत एकत्रितपणे १५० अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे. भारतीय कॉर्पोरेटने केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

हे ही वाचा:

सांगलीमधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा

“‘मातोश्री’च्या निकटवर्तीयाकडून नितीन देसाईंना धमक्या”

नीरज चोप्रा जगज्जेता

गॅलेक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तीन दगावले

जिओ एअर फायबरबद्दल मोठी घोषणा

मुकेश अंबानी म्हणाले की, डिसेंबरपासून ग्राहकांना देशातील प्रत्येक भागात ५ जी सेवा मिळण्यास सुरुवात होईल. तसेच मुकेश अंबानींनी जिओ एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली. जिओ एअर फायबर गणेश चतुर्थी म्हणजेच, १९ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा