28.6 C
Mumbai
Wednesday, July 29, 2026
घरबिजनेसआयटीचा ‘पॉवर प्ले’! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी

आयटीचा ‘पॉवर प्ले’! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी

सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला

Google News Follow

Related

भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (२७ जुलै) मजबूत जागतिक संकेतांच्या जोरावर सकारात्मक सुरुवात केली. मात्र, आजच्या व्यवहारात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते आयटी क्षेत्राने. आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्याने निफ्टी आयटी निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वधारत सर्वाधिक तेजीत राहिला. सकाळी सेन्सेक्स ५०७ अंकांनी (०.६७ टक्के) वाढून ७६,५६७ वर, तर निफ्टी १३४ अंकांनी (०.५६ टक्के) वाढून २३,९०१ वर व्यवहार करत होता. आयटी क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराला भक्कम आधार मिळाला.

इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा या आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये चांगली खरेदी झाली. याशिवाय एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, एलअँडटी, एनटीपीसी, एसबीआय, पॉवर ग्रिड, टायटन, अदाणी पोर्ट्स आणि भारती एअरटेल या समभागांमध्येही वाढ झाली. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट हे दोनच समभाग घसरणीत होते.

आयटीसह इतर क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही सकारात्मक वातावरण दिसून आले. निफ्टी मीडिया, एफएमसीजी, कन्झम्प्शन, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक, रिअॅल्टी, ऑटो, फार्मा, मेटल आणि एनर्जी निर्देशांकही हिरव्या निशाणावर व्यवहार करत होते. बाजारातील तेजी केवळ लार्जकॅपपुरती मर्यादित राहिली नाही. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ६०८ अंकांनी वाढून ६२,२३१, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक १७४ अंकांनी वाढून १९,०५९ वर पोहोचला.

हे ही वाचा:

मालीत भारतीय हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; ४४ कोटींची ‘डील’

२०२७ ठरणार पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष? एल निनोचा प्रभाव कायम

विजेसाठी १२ वर्षांचा संघर्ष; जनता दरबारानंतर घरात प्रथमच पेटला बल्ब

मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!

बाजार विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमती ९० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. अमेरिका-इराणमधील तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असून, त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. मात्र, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) अस्थिर गुंतवणूक कल अद्यापही बाजारासाठी चिंतेचा विषय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
324,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा