27.9 C
Mumbai
Sunday, July 26, 2026
घरराजकारणमी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!

मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!

दिल्ली भेटीवरून उठवलेल्या वावड्यांना फडणवीसांनी दिले उत्तर

Google News Follow

Related

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल दिलेल्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मीडियातही याच बातम्यांची चर्चा होती. त्यावरून विरोधकांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्नही केला. या तर्कवितर्कावर नंतर देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश करणार अशा बातम्या येऊ लागल्या.  मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सर्व चर्चांवर पडदा टाकला. ते म्हणाले की “मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात होती आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिक्षण किंवा अन्य महत्त्वाचे खाते दिले जाईल, अशी बातमी शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण येणार, याबाबतही त्यांनी भाष्य केले.

हे ही वाचा:

पाकिस्तानवर मात करत भारताचा सुवर्ण विजय

लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयाला मोदींचा सलाम

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक पदक

जंतर मंतरवरुन परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण

दिल्लीवरून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अफवा फेटाळून लावले. “माझ्या दिल्ली दौऱ्यावरून आणि केंद्रात जाण्यावरून ज्या विविध चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहून जनतेची सेवा करणार आहे.” फडणवीसांच्या या स्पष्टीकरणामुळे या सगळ्या वावड्यांवर पडदा पडला.

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचीही चर्चा

दरम्यान, याआधीच पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यावर सूचक विधान केले होते. “आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे त्यांनी मिश्किलपणे पण ठामपणे सांगितले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा