31 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरअर्थजगतजयपुरिया लखनऊ बनले उद्यमतेचे केंद्र

जयपुरिया लखनऊ बनले उद्यमतेचे केंद्र

मयंक सिसोदिया याला शार्क टँक इंडियाकडून मिळाली एक कोटीची गुंतवणूक

Google News Follow

Related

जयपुरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी नावाजले जाते. आताच्या बदलत्या युगात अनेक युवकांचा कल नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याकडे आहे. गेल्या काही वर्षांत भारतात स्टार्टअप संस्कृतीत वाढ झाली आहे. यासाठी लखनऊतील जयपुरिया इन्स्टिट्यूटमध्ये एमबीए अभ्यासक्रमात अनुभवपर शिक्षण देण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. येथील माजी विद्यार्थी मयंक सिसोदिया याने स्टार्टअप रिऍलिटी टीव्ही शो शार्क टँक इंडिया सिजन ३ मध्ये एक कोटीची गुंतवणूक मिळवून या शिक्षणसंस्थेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

मयंक हा उत्तर प्रदेशातील धामपूर येथील रहिवासी आहे. त्याने लखनऊतील जयपुरीया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सन २००८-०९च्या बॅचमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ‘शार्कटँकमध्ये मिळालेले यश हे जयपुरिया लखनऊमध्ये शिकलेल्या अमूल्य अभ्यासक्रमाचा परिणाम आहे. कॅम्पसमधून मला केवळ ज्ञानप्राप्ती झाली नाही तर, आंत्रप्रिन्युरशिप मानसिकतेची जडणघडणही येथे झाली. या कॅम्पसने माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,’ अशी प्रतिक्रिया मयंकने दिली.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘आप’चे चंदिगडचे महापौरपद टिकेल काय?

अभिनेत्री विद्या बालन चे बनावट खाते तयार करून फसवणूक!

कल्याण रेल्वे स्थानकातून डिटोनेटर्सचा साठा जप्त!

लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

याआधी इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनेस्ट होम कंपनी, इंफ्रा मंत्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि लिबास-ए-लखनऊ सारख्या तीन स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा