31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरअर्थजगतसन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार

सन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार

मॉर्गन स्टॅनली इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांना विश्वास

Google News Follow

Related

मॉर्गन स्टॅनली इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऱ्हीदम देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले असून १० वर्षांच्या अल्प कालावधीत भारताने जागतिक स्तरावर स्थान मिळवल्याचे प्रतिपादन केले आहे. संपूर्ण जीडीपीच्या (राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न) बाबतीत भारत २०२७ पर्यंत पहिल्या तीनमध्ये असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी अँड इकॉनॉमिक्स: हाऊ इंडिया हॅज ट्रान्सफॉर्म्ड इन लेस द डिकेड’ या अहवालात असे भाकीत केले आहे की, भारत आशियासाठी प्रमुख प्रेरणा म्हणून उदयास येईल आणि पुढील दशकात जागतिक वाढीचा पाचवा हिस्सा म्हणून पुढे येईल. पुढील दशकात, भारताचे ठोकळ राष्ट्रीय उत्पन्न आताच्या ३.१ ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत २०३२पर्यंत ७.९ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. अहवालात असे म्हटले आहे की, भारताचे दरडोई उत्पन्न सध्याच्या दोन हजार २०० डॉलरवरून आर्थिक वर्ष २०३२पर्यंत पाच हजार २०० डॉलरपर्यंत पोहोचेल.

 

भारताच्या वाढीबद्दल बोलताना ऱ्हीदम देसाई म्हणाले, ‘संपूर्ण जीडीपीच्या बाबतीत, भारत २०२७पर्यंत पहिल्या तिनात असेल. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत, पाच हजार २०० डॉलरपर्यंत पोहोचण्यास खूप वेळ लागेल. तोपर्यंत आम्ही एक मध्यम-उत्पन्न अर्थव्यवस्था बनू. आमच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग जगण्यापुरते उत्पन्न मिळवत असल्याने आम्ही आजच्याइतके गरीब राहणार नाही. आम्ही दोन वर्षांत त्या कालावधीतून बाहेर पडू,’

 

वाढत्या अर्थव्यवस्थेचा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तफावतीवर काय परिणाम होतील, याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, ‘भारतातील विषमता कमी होत जाईल, कारण आपण अधिक समृद्ध होऊ. जेव्हा आपण जीडीपी वाढवू शकत नाही तेव्हा विषमता वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. दरडोई उत्पन्न पाच हजार २०० डॉलरवर पोहोचल्यास आजच्या तुलनेत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी असेल.’

या अहवालात भारताच्या वाढीच्या अंदाजाची चीनशी तुलना करण्यात आली आहे. यावर ऱ्हीदम देसाई म्हणाले की, चीनमध्ये ३० वर्षांची प्रचंड वाढ झाली आहे आणि ती आता संपली आहे. त्यामुळे चीनची वाढ झपाट्याने कमी होत आहे. खरे तर या वर्षी चीनची लोकसंख्या कमी होणार आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या विकासदरावर होणार आहे. भारताचा प्रगतीचा कालावधी ३० वर्षांचा असणार नाही. तो खूप जास्त काळ टिकेल, कारण चीनपेक्षा आपल्याकडे लोकसंख्येची परिस्थिती चांगली आहे.”

ते पुढे म्हणाले, “या शतकाच्या उत्तरार्धात भारताचा विकास चीनपेक्षा अधिक वेगाने होत असल्याचे दिसेल. चीनला गाठण्यासाठी भारताला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि या दशकाच्या अखेरीस हे अंतर खूप कमी होईल.’ ‘बर्‍याच कंपन्या चीनपासून दूर जाऊ पाहत आहेत आणि भारत हे त्यांना गुंतवणूक करण्यासाठी एक नैसर्गिक ठिकाण आहे, कारण तेथे सरकारी प्रोत्साहने आहेत. व्यवसाय करण्यासाठी चांगले वातावरण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत हे बाजारपेठेच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येत्या दहा वर्षांत कंपन्यांना भारतात राहणे खूप आकर्षक वाटेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा

विरोधकांनी नव्या संसदभवनाकडे तोंड फिरवले; पण चीनने केले कौतुक

कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज

स्वीडन युरोपमधील पहिला ‘धूम्रमुक्त’ देश होणार

 

गेल्या १० वर्षांतील भारताच्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. ‘डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, आम्ही जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी जास्त प्रगती केली आहे. तथापि, आम्हाला अजूनही आमच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. डिजिटल, सेवा आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रात आम्ही खूप चांगली कामगिरी करत आहोत, परंतु पायाभूत सुविधांसारख्या कठीण गोष्टींमध्ये आम्ही मागे आहोत. गेल्या दहा वर्षांत बरेच काही बदलले आहे. भारत पूर्वीसारखा असुरक्षित किंवा छोटा देश राहिलेला नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात स्थिरता प्राप्त केली आहे. रुपयाचे अवमूल्यन होत असल्याचे दिसत असले तरी, प्रत्यक्षात चांगली कामगिरी करणाऱ्या चलनामध्ये त्याचा समावेश आहे,’ असेही देसाई यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा