30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरअर्थजगतआता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!

आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!

नोटांच्या बदल्यात मिळणार नाणी

Google News Follow

Related

बसने प्रवास करा, नाहीतर टॅक्सीने अगदी बाजारात खरेदीला गेलात तरी सुट्या पैशाची समस्या काही तुमची पाठ सोडत नाही. त्यातून आता जीपे, फोनपे वर व्यवहार वाढल्याने तर सुट्या पैशाची अडचण जाणवतच आहे. पण आता चिंता करू नका रिझर्व्ह बँकेने तुमची ही चिंता दूर केली आहे. आता खिशात सुटे पैसे नसतील तर वाटेने जाताना तुम्हाला कधीही सुटे पैसे मिळू शकणार आहेत. आपण एटीएममध्ये गेलो की फक्त नोटाच काढता येतात. पण आता एटीएममध्ये सुटी नाणी खुळखुळण्याचा आवाज ऐकायला मिळणार आहे.एटीएममधील क्यूआर कोडवर आधारित कॉइन वेंडिंग मशीनमधून नाणी काढता येणार आहेत.

कोणतीही व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करून आणि यूपीआयद्वारे या व्हेंडिंग मशिनमधून नाणी काढू शकेल. बारा शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही मशीन लवकरच बसवण्यात येणार आहेत. कॉइन व्हेंडिंग मशीन हे स्वयंचलित मशीन असून ते चलनी नोटांच्या बदल्यात नाणी वितरीत करतील.

नाणे निधी धोरणाची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, लवकरच रिझर्व्ह बँक यासाठी प्रायोगिक प्रकल्प सुरू करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बँकांना अशी मशिन बसवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. क्यूआर कोडवर आधारित कॉईन व्हेंडिंग मशीन १२ शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. गव्हर्नर म्हणाले की यामुळे नाण्यांची चणचण दूर होईल. मशीन वापरून नाणी वितरित करणे सुलभ होईल. कॉइन व्हेंडिंग मशीन ही स्वयंचलित मशीन आहेत जी बँक चलनी नोटांच्या बदल्यात नाणी वितरीत करतात.

हे ही वाचा:

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

रेपो दरात वाढ.. गृहकर्जाचा हप्ता महागणार

३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो

श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली

ही यंत्रे कशी काम करतील

गव्हर्नर लक्ष्मीकांतदास यांच्या म्हणण्यानुसार ही व्हेंडिंग मशीन बँक नोटांऐवजी युपीआयचा वापर करून ग्राहकाच्या खात्यातून पैसे घेतील आणि त्या मूल्याची नाणी देतील. त्यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होईल. या प्रयोगाला यश मिळाल्यास या मशीन्सचा वापर करून नाण्यांच्या वितरणास प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

यूपीआय व्यवहारांची व्याप्ती वाढेल

आरबीआयने व्यावसायिक कामाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रवाशांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सुविधेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सुरुवातीला ही सुविधा जी २० देशांतील प्रवाशांसाठी असेल.मात्र, ही सुविधा निवडक विमानतळांवरच सुरू करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा