30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरअर्थजगतआज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार 'हा' फायदा

आज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा

Google News Follow

Related

रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय आज पासून आपल्या दोन नव्या अभिनव योजनांची सुरुवात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन योजनांचा प्रारंभ होणार आहे. या दोन्ही योजना ग्राहक केंद्रीत असून आज म्हणजेच शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या योजनांना प्रारंभ करणार आहेत.

आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरबीआयची प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजना अशी या दोन योजनांची नावे आहेत. या नव्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे भारतीय बँक खातेधारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे आरबीआय मार्फत सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

काय आहेत या योजना?

आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम
भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांना गव्हर्मेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये अर्थात सरकारी रोखे बाजारात सहज आणि व्यापक प्रवेश शक्य व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे यांच्यामार्फत जारी करण्यात येणाऱ्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज अर्थात सरकारी रोख्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करण्याची नवी संधी या योजनेद्वारे प्राप्त होणार आहे. हे गुंतवणूकदार आरबीआय सोबत मोफत आणि सुलभपणे सरकारी रोखे खाते अर्थात गव्हर्मेंट सिक्युरिटी अकाउंट उघडू शकतात आणि ते देखील ऑनलाइन पद्धतीने

एकात्मिक लोकपाल योजना
या योजनेचा मुख्य उद्देश तक्रार निवारण यंत्रणा सुधारण्याचा आहे. रिझर्व बँकेकडून नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांविरुद्धच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण योग्य प्रकारे व्हावे, या दृष्टीकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक राष्ट्र, एक लोकपाल या मध्यवर्ती संकल्पने सह एक पोर्टल, एक ई-मेल आणि एकच पत्ता या तत्त्वावर ही योजना बेतलेली आहे. यामुळे ग्राहक एकाच ठिकाणी त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतील, दस्तावेज सादर करू शकतील तक्रारीची सद्यस्थिती समजून घेऊ शकतील आणि त्याला प्रतिसादही देऊ शकतील. बहुभाषी आणि निशुल्क अशा क्रमांकावर तक्रार निवारणासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य आणि माहिती पुरवली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनांचा प्रारंभ होणार असून यावेळी केंद्रीय अर्थमंत्री तसेच रिझर्व बँकेचे गव्हर्नरही उपस्थित असणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा