28.3 C
Mumbai
Monday, July 27, 2026
घरबिजनेसआयटीआर फायलिंगमध्ये विक्रमी वेग; ४ कोटींहून अधिक रिटर्न दाखल

आयटीआर फायलिंगमध्ये विक्रमी वेग; ४ कोटींहून अधिक रिटर्न दाखल

आयकर विभागाची माहिती

Google News Follow

Related

असेसमेंट वर्ष २०२६-२७ साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याचा वेग लक्षणीय वाढला असून, आतापर्यंत ४ कोटींहून अधिक करदात्यांनी आपले रिटर्न दाखल केले आहेत. सोमवारी (२७ जुलै) आयकर विभागाने यासंबंधी माहिती जाहीर केली. तसेच, अंतिम मुदतीच्या गर्दीपासून बचाव करण्यासाठी पात्र करदात्यांनी आयटीआर-१ (सहज) आणि आयटीआर-२ शक्य तितक्या लवकर भरावेत, असे आवाहनही विभागाने केले आहे.

यापूर्वी आठवडाभरापूर्वीच आयटीआर दाखल करण्याचा आकडा ३ कोटींवर पोहोचल्याची माहिती विभागाने दिली होती. त्या दिवशीच विक्रमी १५ लाखांहून अधिक आयकर रिटर्न दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अंतिम मुदत जवळ येत असताना करदात्यांचा प्रतिसाद झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला १.७ कोटींहून अधिक नागरिकांनी आयकर रिटर्न भरल्याची नोंद झाली होती. आता ३१ जुलै ही अंतिम तारीख जवळ येत असल्याने रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

आयकर विभागाने करदात्यांना शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये, असे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. अंतिम दिवसांमध्ये ई-फायलिंग पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत रिटर्न दाखल केल्यास प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद पूर्ण होण्यास मदत होते, असे विभागाने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

‘नीट’ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विसरून ‘कॉक्रोच’ नेत्यांची जंगी पार्टी

अभिषेक बॅनर्जींच्या ‘सेवाश्रय’ शिबिरातील डॉक्टर-विद्यार्थ्यांची होणार चौकशी

“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”

‘नीट’ परिक्षेत फक्त ११ गुणांनी कटऑफ हुकल्याने विद्यार्थीनीने जीवन संपवले

आयटीआर-१ (सहज) हा फॉर्म अशा निवासी व्यक्तींसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत असून त्यांना वेतन, एक घरमालमत्ता आणि इतर स्रोतांमधून उत्पन्न मिळते. यामध्ये ५,००० रुपयांपर्यंतच्या कृषी उत्पन्नाचाही समावेश असू शकतो. तर आयटीआर-२ हा फॉर्म अशा व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी (HUF) आहे, ज्यांचे व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न नसते; मात्र भांडवली नफा (Capital Gains) किंवा इतर स्रोतांमधून उत्पन्न मिळते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा