26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरअर्थजगतमुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

बँक आणि वित्तीय सभंगांची तुफान खरेदी

Google News Follow

Related

गेल्या सहा दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. भांडवल बाजारातील तमाम गुंतवणूकदारांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले. मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये झालेलया दणकून खरेदीमुळे गुंतवणूकदारांनी नफ्याची दिवाळी साजरी केली. त्यातही बँक आणि वित्तीय सभंगांची तुफान खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स ५२५ अंकांची उसळी घेत ५८८३२ अंकांच्या पातळीवर गेला. मुहूर्ताच्या सौद्यात २००८ नंतर झालेली सर्वात मोठी वाढ असल्याचे बाजारातील तज्ञ मंडळींचे मत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या मुहूर्ताच्या निमित्ताने शेअर बाजार उत्साहाचे वातावरण होते मुहूर्तासाठी संध्याकाळी ६.१५ ते ७ .१५ या फक्त एक तासाच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास ७०० अंकांनी वाढून ६०हजारांच्या जवळपास म्हणजे ५९,९९४.२५ अंकांवर पोहोचला.त्याचवेळी निफ्टीमध्येही जोरदार खरेदीचे वातावरण होते. व्यवहाराअंती सेन्सेक्स ५९,८३१.६६ अंकांवर बंद झाला. मागील दिवसाच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये ५२४. ५१ अंकांनी वाढ झाली . दुसरीकडे, निफ्टी १५५ अंकांनी वाढून १७,७३०.७५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी विक्रम संवत वर्ष २०७९ ची सुरुवात देखील झाली. संवत वर्षाची सुरुवात पारंपारिकपणे मुहूर्त सत्राने होते. गुंतवणूकदार यादिवशी विक्री करणे टाळून साधारणपणे समभाग खरेदी जास्त करतात. मुहूर्ताच्या व्यवहारात महिलांनीही उत्साह दाखवला.

बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची घेतलेली सूत्रे भांडवल बाजारासाठी मोठी दिवाळी भेट ठरली. त्यामुळेही बाजारात खरेदीचा उत्साह वाढला. सोबतच एल अँड टी, आयसीआयसीआय बँक , एचडीएफसी बँक , टाटा कंझ्युमर आणि नेस्ले इंडिया यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

सेन्सेक्स ६६ हजारांवर झेपावणार
एकूणच वर्षभर बाजारावर दबाव होता. संवतच्या सुरुवातीला कोविड १९ च्या प्रभावामुळे, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भू-राजकीय तणाव, महागाई, मंदीची भीती, दर वाढ, एफपीआयची विक्री यामुळे वर्षभर बाजारात अनिश्चितता होती. परंतु दीर्घकाळात बाजारात भक्कम वातावरण असेल असे मत ब्रोकरेज हाऊसेसने व्यक्त केले आहे. संवत २०७९ च्या अखेरीस बाजार नवीन उच्चांक गाठू शकेल. निफ्टी २०हजार आणि सेन्सेक्स ६६ हजारांच्या पातळीवर जाऊ शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा