29 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरबिजनेसटाटा मोटर्सच्या इव्हेको खरेदीचा मार्ग मोकळा

टाटा मोटर्सच्या इव्हेको खरेदीचा मार्ग मोकळा

४१,५८० कोटींच्या डीलला मंजुरी

Google News Follow

टाटा मोटर्सला इटलीची व्यावसायिक वाहन कंपनी इव्हेको खरेदी करण्याच्या व्यवहारात मोठे यश मिळाले आहे. इटलीच्या भांडवली बाजार नियामक कन्सॉबने (CONSOB) टाटा मोटर्सच्या खुल्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. टाटा मोटर्सची पूर्ण मालकी असलेली कंपनी टीएमएल सीव्ही होल्डिंग्स बी.व्ही. इव्हेकोचे समभाग खरेदी करण्यासाठी ही ऑफर देत आहे. या संपूर्ण व्यवहाराची किंमत सुमारे ३.८ अब्ज युरो म्हणजेच जवळपास ४१,५८० कोटी रुपये आहे. कन्सॉबच्या मंजुरीमुळे या व्यवहारातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून आता इव्हेकोच्या भागधारकांना आपले समभाग टाटा मोटर्सला विकण्याची संधी मिळणार आहे.

टाटा मोटर्स प्रत्येक इव्हेको समभागासाठी १४.१० युरो देणार आहे. भागधारकांसाठी ही ऑफर ७ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर २०२६ या काळात खुली राहणार आहे. या कालावधीत समभाग विकणाऱ्या भागधारकांना ३० ऑक्टोबरला पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. काही अटी पूर्ण झाल्यास ऑफर पुन्हा २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान पाच दिवसांसाठी खुली होऊ शकते. या अतिरिक्त कालावधीत समभाग देणाऱ्यांना १३ नोव्हेंबरला पैसे मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त

सोनिया गांधींचे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडिया करणार प्रकाशित

‘चीनवरील अवलंबित्वाचा धोका युरोपआधी भारताने ओळखला!’

फोक्सवॅगन ५० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

इव्हेकोची खरेदी टाटा मोटर्ससाठी मोठी महत्त्वाची मानली जात आहे. इव्हेको ही ट्रक, बस आणि इतर व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या व्यवहारामुळे टाटा मोटर्सचा युरोपमधील व्यवसाय मजबूत होण्यास मदत होईल. तसेच कंपनीला इव्हेकोचे तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूत नेटवर्क याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे या व्यवहाराकडे टाटा मोटर्सच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा