25 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरअर्थजगतयंदाचा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल

यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला, युवा वर्ग, शेतकरी आणि गरीब अशा चार घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अंतरिम अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विकासीत भारताची गॅरंटी दिली असून हे बजेट भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि कल्पक आहे. या अर्थसंकल्पात सातत्याचा विश्वास असून हा अर्थसंकल्प युवक, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तभांचे सबलीकरण करेल. हा अर्थसंकल्प २०४७ मधील विकसित भारताचा पाया रचण्याची हमी देतो,” असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. तसेच चांगला अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

संशोधनावर १ लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअप्सला मिळणाऱ्या करसूटीचा विस्तार करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवतानाच भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आलं आहे. यामुळे भारतात २१ व्या शतकासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अर्थसंकल्पात प्राप्तीकर सूट योजनेची (Income tax remission scheme) घोषणा करण्यात आली असून या योजनेमुळे मध्यमवर्गातील १ कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे. तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले. नॅनो डीएपीचा उपयोग, नव्या पशू योजना, पीएम मत्स संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान अशा योजनांचा समावेश आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

हे ही वाचा:

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

जनहितासाठी काम केले, रोजगाराच्या संधी वाढल्या, लोकांचे उत्पन्न वाढले!

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल्वेच्या दर्जाच्या कोच विषयीच्या निर्णयाचेही स्वागत केले. यामुळे कोट्यवधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय गरिबांसाठी गाव आणि शहरांमध्ये चार कोटीहून अधिक घरं निर्माण केली. आता दोन कोटी आणखी घरं बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असंही ते म्हणाले. तसेच दोन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं ध्येय ठरवलं होतं. मात्र, यात वाढ करून आता हे ध्येय तीन कोटींपर्यंत केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा