25 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025
घरबिजनेसआठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार

आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार

Google News Follow

Related

सांगलीतील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली मिनी जिप्सी चर्चेत असतानाच पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. अशोक आवटी यांनी देखील भंगारातील रिक्षाचे साहित्य आणि इतर साहित्य वापरून, १९३० सालची फोर्ट गाडीची हुबेहूब गाडी बनवलीय.

आठवीपर्यंतच शिक्षण झालेल्या अशोक आवटी नावाच्या मॅकेनिकल कारागिराने ही भन्नाट गाडी बनवली आहे.
काकानगर मध्ये टू व्हीलर गाड्या व ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज आहे. आपल्या मुलांना खेळण्यासाठी चार चाकी गाडी असावी असे त्याला वाटायचे. आणि आपल्या कल्पकता आणि २०२० ला सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात युट्युब वरचे व्हिडिओ पाहून त्याने गाडी बनवण्यास सुरवात केली. आज दीड-दोन वर्षानंतर अशोक आवटीचे स्वप्न प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले आहे.

ही फोर्ड गाडी रिक्षा प्रमाने हँड किक वर सुरु होणारी आहे आणि रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअरबॉक्स बसवला आहे. या गाडीचे इंजन हे एमएटी दुचाकीचे आहे. तर स्टेरिंग हा छोट्या ट्रॅक्टरचा आहे. ही गाडी पेट्रोल वर चालत असून ३० किमी इतका मायलेज देते.

हे ही वाचा:

भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी

आता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास

तो काश्मीरी तरुण करत होता हिंदू देवतांची तस्करी

पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, पण मुख्यमंत्री पालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित?

 

चार व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात. आता आवटी यांची ही भन्नाट १३० मॉडेलची अगदी फोर्डच्या खऱ्याखुऱ्या गाडीप्रमाणे दिसणारी हुबेहूब गाडी रस्त्यावर धावू लागली असून, येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष ही मिनी फोर्ड गाडी वेधून घेत आहे. फोर्डचे वजन जवळपास १०० किलो इतके आहे. हुबेहूब फोर्डसारख्या दिसणाऱ्या या गाडीला बनवायला फक्त तीस हजार रुपये खर्च आला आहे.

अशोक यांना पहिल्यापासून सतत नावीन्यपूर्ण काहीतरी करायचं वेड होतं त्यातूनच या या गाडीचे अशोक यांना निर्मिती केली. असे अशोक यांचे भाऊ,आई आणि पत्नी यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा