20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरधर्म संस्कृतीभारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली 'ही' देणगी

भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी

Related

हैदराबाद मुख्यालय असलेल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी वैकुंठ एकादशी उत्सवानिमित्त तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे संरक्षक असलेल्या तिरुमला देवस्थान बोर्डाला भरघोस देणगी दिली आहे.

भारत बायोटेकने तब्बल दोन कोटी रुपयांची देणगी या देवस्थानला दिली आहे. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर, हैदराबादमध्ये मुख्यालय असलेल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे सीएमडी, फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर उत्पादनांचे निर्माते कृष्णा एला आणि पत्नी सुचित्रा यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी )कार्यकारी अधिकारी केएस जवाहर रेड्डी आणि अध्यक्ष वायव्ही यांना दोन कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला.

अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, एला आणि त्यांची पत्नी सुचित्रा यांनी टीटीडीला श्री वेंकटेश्वर अन्नप्रसाद ट्रस्टच्या यात्रेकरूंसाठी मोफत जेवणासाठी देणगीची रक्कम वापरण्याची विनंती केली आहे. नंतर, एला आणि त्याच्या पत्नीला मंदिर व्यवस्थापनाने इतर गोष्टींसह एक पवित्र रेशमी कापड दिले.

हे ही वाचा:

आता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास

राजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब  

पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, पण मुख्यमंत्री पालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित?

चित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू

 

त्याआधी डिसेंबर महिन्यात कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांनी सबरीमाला येथील अन्नदानासाठी सबरीमाला अय्यप्पास्वामी यांना एक कोटींची देणगी दिली होती. वृत्तानुसार, वैकुंठ एकादशी उत्सवानिमित्त मंदिराला भेट देण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण, एपी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा, तेलंगणाचे मंत्री टी हरीश राव, गंगुला कमलाकर, तलासनी श्रीनिवास यादव, आंध्र प्रदेशचे मंत्री औडिमुलापू सुरेश हेही उपस्थित होते.

टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले की, संक्रांतीपूर्वी आणि वैकुंठ एकादशीला मंदिरात मोठी गर्दी होते. आंध्र प्रदेशच्या कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, धार्मिक संस्था खुल्या आहेत. तथापि, भाविकांनी मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारखे कोविड-19 चे सर्व नियम पाळणे अपेक्षित आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा