29 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरक्राईमनामाव्यावसायिकाला धमकी देण्यासाठी वापरला थेट अजित पवारांचाच मोबाईल नंबर

व्यावसायिकाला धमकी देण्यासाठी वापरला थेट अजित पवारांचाच मोबाईल नंबर

Google News Follow

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करुन पुण्यातील बड्या बांधकाम व्यावयायिकाला फोन करुन, त्याच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे शहरातील एका बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे सांगणारा फोन आला होता. ऍपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन आरोपींनी त्यावरुन बांधकाम व्यवसायिकाला फोन केला. त्यानंतर त्यांनी बिल्डरकडे २० लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गूगल प्ले स्टोअरवरुन फेक कॉल हे ऍप डाऊनलोड केले होते. या ऍपच्या मदतीने आरोपींनी अजित पवारांचा मोबाईल नंबर वापरला होता. तसेच, आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलत असल्याचे सांगून २० लाखांची खंडणी मागितली होती.

हे ही वाचा:

भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी

आता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास

राजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब  

पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, पण मुख्यमंत्री पालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित?

गेल्या दहा दिवसांपासून संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडे हे आरोपी खंडणीची मागणी करत होते. बांधकाम व्यवसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, सौरभ नारायण काकडे, चैतन्य राजेंद्र वाघमारे, आकाश शरद निकाळजे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी ३८४, ३८६, ५०६, ३४ आयटी ऍक्ट कलम ६६ (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा