27 C
Mumbai
Friday, January 28, 2022
घरक्राईमनामातो काश्मीरी तरुण करत होता हिंदू देवतांची तस्करी

तो काश्मीरी तरुण करत होता हिंदू देवतांची तस्करी

Related

तामिळनाडू पोलिसांनी मूर्ती चोराच्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांचा संबंध एका आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जोडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून सुमारे ४० कोटी रुपयांच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. मूर्तीची तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव जावेद शाह असून तो काश्मीरचा रहिवासी आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक, तामिळनाडू पोलिसांच्या CB-CID च्या पुतळा शाखा यांना महाबलीपुरममधील एका दुकानात अनेक मूर्ती बेकायदेशीरपणे ठेवल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे विशेष पथक तयार करून पोलिसांनी जावेद शाह याच्या इंडियन हॅण्डीक्राफ्ट एम्पोरियममधील दुकानावर छापा टाकला. त्यानंतर समोर आलेल्या माहितीचा तपास करून व्यापारी जावेद शाह याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी छाप्यामध्ये त्याच्या दुकानातून अनेक प्राचीन आणि दुर्मिळ मूर्ती जप्त केल्या आहेत. यातील अनेक शिल्पे ११ व्या शतकातील आहेत. जावेदकडे या मूर्तीचा परवाना नसल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा:

भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी

पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, पण मुख्यमंत्री पालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित?

व्यावसायिकाला धमकी देण्यासाठी वापरला थेट अजित पवारांचाच मोबाईल नंबर

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

 

त्याच्याकडून अनेक पुरातन मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मूर्तींमध्ये देवी पार्वती, बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती, दहा मुखी रावण आणि इतर पुरातन वस्तूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे ४० कोटी आहे. पोलिसांनी एक विशेष टीम तयार केली आहे. जावेद शाह हा या रॅकेटचा छोटासा भाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचे संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बड्या गुन्हेगारांशी जोडले जाऊ शकतात. म्हणून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,598अनुयायीअनुकरण करा
5,850सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा