20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरदेश दुनियाआता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास

आता भारतीय ५९ देशांत करू शकणार व्हिसाशिवाय प्रवास

Related

जर तुम्ही भारतीय असाल आणि तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची चांगली बातमी आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने जाहीर केलेल्या २०२२ च्या क्रमवारीत भारतीय पासपोर्ट आता ८३ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर, गेल्या वर्षी भारत ९० व्या क्रमांकावर होता. ओमानने भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी दिल्यामुळे भारतीय पासपोर्टची क्रमवारी सुधारली आहे. भारतीय आता ५९ देशात व्हिसाशिवाय प्रवास करू शकणार आहेत.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या डेटाच्या आधारे पासपोर्टची क्रमवारी जारी करते. यात १९९ देशांची क्रमवारी जाहीर केली जाते. या क्रमवारीमुळे कोणत्या देशाच्या पासपोर्टची ताकद किती आहे याची माहिती मिळते. पासपोर्टची ताकद दाखवणारी ही क्रमवारी देशाच्या पासपोर्टने तुम्ही व्हिसाशिवाय जगातील किती देशांमध्ये प्रवास करू शकता यावर अवलंबून आहे. त्यानुसार, जपान आणि सिंगापूरचे पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या दोन देशांचे पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. जपान आणि सिंगापूर देशातील पासपोर्टधारक १९२ देशात व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

या क्रमवारीत भारताचा पासपोर्ट ८३ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता भारतीय पासपोर्टद्वारे जगातील ५९ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारताचा पासपोर्ट ९० व्या क्रमांकावर होता, तेव्हा भारताला एकूण ५८ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी दिली होती. तथापि, ओमानने भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी दिल्यामुळे भारतीय पासपोर्टची क्रमवारी सुधारली आहे.
या ५९ देशांमध्ये भारतीय व्हिसामुक्त प्रवास करू शकतात.

हे ही वाचा:

साहेबांची उडवाउडवी

पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर, पण मुख्यमंत्री पालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित?

राजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब  

चित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू

 

मिंटच्या अहवालानुसार , भारतीय पासपोर्ट धारक कुक आयलंड, फिजी, मार्शल आयलंड, मायक्रोनेशिया, नियू, पलाऊ बेटे, सामोआ, तुवालु, वानुआतु, इराण, जॉर्डन, ओमान, कतार, अल्बानिया, सर्बिया, बार्बाडोस, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, डोमिनिका, ग्रेनेडा, हैती, जमैका, मोन्सेरात, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मकाऊ, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, तिमोर-लेस्ते, बोलिव्हिया , एल साल्वाडोर, बोत्सवाना, केप वर्दे बेटे, कोमोरेस बेटे, इथिओपिया, गॅबॉन, गिनी-बिसाऊ, मादागास्कर, मॉरिटानिया, मॉरिशस, मोझांबिक, रवांडा, सेनेगल, सेशेल्स, सेरा लिओन, सोरा लिओन, सोनाडागोनिया, टोमिया , ट्युनिशिया, युगांडा,झिम्बाबवे या ५९ देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा