34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरअर्थजगत...म्हणून एअर इंडिया विकत घेणे टाटांसाठी आहे खास

…म्हणून एअर इंडिया विकत घेणे टाटांसाठी आहे खास

Google News Follow

Related

एअर इंडिया या भारताच्या राष्ट्रीय विमान कंपनीचे खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार १५ सप्टेंबर रोजी या लिलावासाठी निविदा पाठवण्याची अंतिम तारीख होती. हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आधीच स्पष्ट केले होते की एअर इंडियाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया ठरल्यानुसारच होईल आणि त्यात कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाहीत. त्यानुसार एअर इंडिया विकत घेण्यासाठी निविदा पाठवण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे.

टाटा सन्स, स्पाईस जेट अशा महत्त्वाच्या कंपन्यांनी या लिलावात सहभाग नोंदवला आहे. पण टाटा समूहासाठी एअर इंडिया ताब्यात घेणे हे अतिशय खास असल्याचे मानले जात आहे. टाटा समूह साठी हा केवळ आर्थिक व्यवहार नसून त्यांची यात भावनिक गुंतवणूक असल्याचेही मानले जात आहे. यामागचे कारणही तसेच आहे.

टाटा हे मुळात एअर इंडियाचे जन्मदाते आहेत. १९३२ साली टाटांनी टाटा एअरलाईन्स या नावाने एक हवाई उड्डाण कंपनी सुरू केली. कालांतराने या कंपनीचे नामांतर एअर इंडिया असे करण्यात आले. पुढे १९५२ सालापर्यंत ही कंपनी टाटा यांच्याच मालकीची होती. पण त्यानंतर भारत सरकारने या कंपनीचा ताबा घेतला. तेव्हापासून एअर इंडिया ही सरकारी हवाई उड्डाण कंपनी झाली. असे असले तरीही १९७७ पर्यंत जे.आर.डी टाटा हेच या कंपनीचे अध्यक्ष होते. हा इतिहास लक्षात घेता टाटा यांना आपणच सुरू केलेली एअर इंडिया कंपनी पुन्हा ताब्यात घेण्यात रस असणार यात काहीच शंका नाही.

हे ही वाचा:

तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…

निवृत्त नौदल सैनिकांना फ्लिपकार्ट मार्फत पुनर्रोजगाराची संधी

पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

सध्या टाटा कंपनी ‘विस्तारा एअरलाइन्स’ चालवते. त्यामध्ये त्यांची ‘सिंगापूर एअरलाइन्स’ सोबत भागीदारी आहे. तर मलेशियाच्या ‘एअर एशिया’ सोबतही टाटांची भागिदारी आहे. ते ‘एअर एशिया इंडिया’ ही कंपनी चालवतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा