28 C
Mumbai
Friday, September 30, 2022
घरदेश दुनियापंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!

पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!

Related

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमधील गुंडगिरीचा अंत झाला आहे. २०१७पूर्वी सत्तेची सूत्रे गुंडांच्या हातातच होती. पण आता परिस्थिती पुरती बदलली असून या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटकांना योगी आदित्यनाथ यांनी तुरुंगाची हवा खायला लावली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगींच्या कार्याची प्रशंसा केली.

गरजूंच्या विविध योजनांत यापूर्वी अनेक अडथळे येत असत पण आता ते सगळे दूर झाले आहेत आणि या योजनांचे लाभ गरजूंना मिळत आहेत.

राजा महेंद्रप्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी योगींच्या कार्याचा आढावा घेतला.

अलिगडच्या कौल तालुक्यात लोढा आणि मुसेपूस करीम जारौली गावाच्या हद्दीत ९२ एकर जमिनीवर हे विद्यापीठ उभे राहात आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश संरक्षण उद्योग कॉरिडोरच्या अलिगढ विभागीय प्रदर्शनालाही भेट दिली.

भारतात यापूर्वी संरक्षण सामुग्री बनविली जात नव्हती पण आता भारत संरक्षण साहित्याच्या बाबत स्वावलंबी बनला आहे असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…

जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत

जालन्यात ६५ वर्षीय शेजाऱ्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

विद्यापीठाची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक महान व्यक्तींनी आपले सर्वस्व खर्च केले आहे. पण देशाचे दुर्दैव असे आहे की स्वातंत्र्यानंतर अशा राष्ट्रीय नायक -नायिकांची ओळख पुढील काळात झाली नाही. पायाभरणीच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या बालपणीची, उपस्थितांनी आतापर्यंत कुठेही न ऐकलेली, वाचलेली आपली एक आठवणही सांगितली.

पंतप्रधान मोदींनी भाषणात आपल्या वडिलांच्या एका मुस्लीम मित्राची आठवणही सांगितली. वडिलांचा हा मित्र अलीगढचा रहिवासी होता आणि टाळेव्यावसायिक होता. आतापर्यंत आपल्या घराच्या आणि दुकानाच्या सुरक्षेसाठी लोक अलीगढवर विश्वास टाकत असत. माहीत आहे ना का? कारण अलीगढचं टाळं वेगळ्या पद्धतीचं असायचं जे लोकांना निश्चिंत करायचं. असे म्हणत त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच याप्रसंगी योगी सरकारचे कौतुकही मोदींनी केले.

लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत मोदींनी अलीगढ संदर्भातील अजूनही काही आठवणी सांगितल्या. लहानपणी आम्ही दोन नावं ऐकत होतो अलीगढ आणि सीतापूर… आमच्या गावात जर एखाद्याला आपल्या डोळ्यांच्या आजारावर उपचार घ्यायचा असेल तर लोकं म्हणायचे की सीतापूरला जा… असं म्हणत उत्तर प्रदेशातील या दोन ठिकाणांची जुनी ओळख मोदींनी आपल्या भाषणात सांगितली.

राजा महेंद्र प्रताप सिंह यांनीच अलीगढ विद्यापीठासाठी जमीन दिली होती. २० व्या शतकात ज्या चुका झाल्या त्या आम्ही २१ व्या शतकात सुधारत आहोत. राजा सुहैलदेव असो वा राजा महेंद्रप्रताप सिंह, त्यांना विस्मरणात टाकलं गेलं. आज आम्ही नव्या पीढीला पुन्हा एकदा त्यांची ओळख करून देत आहोत, असा दावाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
41,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा