28 C
Mumbai
Wednesday, August 19, 2026
घरक्राईमनामासराईत गुन्हेगार 'आरिफ चिना टोळी'वर अखेर 'मकोका'

सराईत गुन्हेगार ‘आरिफ चिना टोळी’वर अखेर ‘मकोका’

Google News Follow

Related

पश्चिम उपनगरात दहशत पसरवून खंडणी उकळणाऱ्या आणि प्राणघातक हल्ले करणाऱ्या सराईत गुन्हेगार आरिफ चिना आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळत वांद्रे पोलिसांनी त्यांच्यावर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वांद्रे आणि पश्चिम उपनगरातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

२० मे रोजी टोळीप्रमुख मो. आरीफ मो. अस्लम शेख उर्फ चिना (३२) याने आपल्या साथीदारांसह एका मटण दुकानदाराकडे व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची (खंडणी) मागणी केली होती. हप्ता देण्यास नकार दिल्याने टोळीने फिर्यादी व त्यांच्या मुलावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारदार कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आरिफ चिनाने स्वतःच्याच टोळीतील मवाश सय्यद याला अजमल खानच्या मदतीने जखमी करून बनाव रचण्याचा प्रयत्नही केला होता.
याप्रकरणी मो. आरीफ मो. अस्लम शेख उर्फ चिना (वय ३२), मवाश अब्दुल अजीज सय्यद (वय ३४),अजमल अयुब खान (वय २७) या तिघांना अटक करण्यात आली होती, गुन्ह्यातील १ फरार साथीदार त्याचा शोध घेण्यात येत आहे.

हे ही वाचा:

गल्लीतील टॅलेंट, ऑलिम्पिकचं टार्गेट; ‘खेलो इंडिया’चा मास्टरप्लॅन!

तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव

चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

हॉर्मुझ सामुद्रधुनी आता अमेरिकेची…ट्रम्प दाव्याने संघर्ष पेटणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ चिना टोळीविरोधात २०१६ पासून हत्या करण्याचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल घडवणे, विनयभंग आणि चोरी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. परिसरात आर्थिक फायदा आणि स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही टोळी सातत्याने गुन्हे करत होती. अखेर या गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याविरोधात मकोका कायद्याचे कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) लागू केले. या गुन्हयाचा सखोल तपास पोलीस उपआयुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग आणि सहायक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अजय लिंगनुरकर, बालाजी भांगे, सपोनि अजित तवटे, सपोउनि देवकांत आणि अंमलदार मकानदार, जाधव, सुरवसे, काझी यांच्या पथकाने ही यशस्वीरित्या केली. फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा