28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामा'Investok' ॲपच्या नावाखाली ३० कोटींची पॉन्झी फसवणूक

‘Investok’ ॲपच्या नावाखाली ३० कोटींची पॉन्झी फसवणूक

मुख्य आरोपी गुजरातमधून अटकेत

Google News Follow

मुंबई : शेअर बाजारात दरमहा २ ते ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ‘Investok’ अॅपच्या माध्यमातून ४२ गुंतवणूकदारांची तब्बल ३०.२६ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे. आरोपीकडून १.६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही माहिती आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी दिली.
या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) तसेच एमपीआयडी (MPID) कायदा आणि बड्स (BUDS) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. आरोपीने स्वतःच्या ‘Investok’ अॅपद्वारे शेअर बाजारात सुरक्षित आणि आकर्षक मासिक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादी, त्यांच्या कुटुंबीयांसह इतर गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभी केली. मात्र, ही रक्कम अनधिकृत ठेव योजनेत वळवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हे ही वाचा:
‘Investok’ ॲपच्या नावाखाली ३० कोटींची पॉन्झी फसवणूक

राजस्थानी परंपरेच्या नेत्रसुखद विमानतळाचे नवे टर्मिनल जोधपूरमध्ये

२० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपले नाव बदलून विविध ठिकाणी वास्तव्य केले आणि पोलिसांपासून लपून राहत होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुरतमधील ठावठिकाणा शोधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. आरोपीकडून सुमारे १.६५ कोटी रुपयांच्या किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने नागरिकांना जास्त परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या पॉन्झी योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तिची कायदेशीर नोंदणी, विश्वासार्हता आणि आवश्यक परवानग्या तपासाव्यात, असेही पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या योजनेत फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा