31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामाझारखंडमध्ये कोळसा खाणीत दबून १३ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये कोळसा खाणीत दबून १३ जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

झारखंडमध्ये खाणकाम करत असताना मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. झारखंडमधील धनबादमध्ये कोळसा खाणीमध्ये ही दुर्घटना मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेत सुमारे १३ लोकांचा मृत्यू झाला असून आणखी काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या दुर्घटनेवेळी महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेकजण या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी अचानक २० फूट उंचीवरून खाणीचा काही भाग कोसळला. हा भाग कोसळताच त्याच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले. यात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच धनबादच्या निरसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. त्यानंतर कोळशाने गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनने खोदकाम करण्यात आले. जखमी लोकांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कोळसा उत्खनन व्यवसाय सुरू आहे. या भागातून बेकायदेशीर कोळसा उत्खनन करून बंगाल आणि इतर राज्यांमध्ये पाठवला जातो. पोलिसांच्या संगनमताने गेल्या अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा सुरू यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा