28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरक्राईमनामादिल्लीत स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; चालक-कंडक्टर अटकेत

दिल्लीत स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; चालक-कंडक्टर अटकेत

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

दिल्लीत स्लीपर बसमध्ये ११ वीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर चालक आणि कंडक्टरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी बस चालक आणि कंडक्टरला अटक केली असून, संबंधित स्लीपर बस जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

माहितीनुसार, पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असून ती नोएडामध्ये राहणाऱ्या आपल्या चुलत भावंडाला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौक येथे पोहोचली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिकाम्या स्लीपर बसला तिने थांबण्याचा इशारा केला. बसचा चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी आपण नोएडा सेक्टर-६३च्या दिशेने जात असल्याचं सांगत तिला बसमध्ये बसवलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, बस पुढे निघाल्यानंतर कंडक्टरने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं. यानंतर आरोपींनी तिला ओल्ड दिल्लीतील काश्मिरी गेट ISBTजवळ रिंग रोडवर सोडलं आणि तेथून फरार झाले. पीडितेने धाडस दाखवत काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा:

दुर्घटनेनंतर चीन – नेपाळ यांच्यात ‘तू तू मैं मैं’

जॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले

नेपाळमधील मृतांचा आकडा ८०० पार; ४ हजारांहून अधिक बेपत्ता

३१ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; हद्दपारीसाठी मालदाला रवाना

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरातील बस पार्किंगमधून चालक आणि कंडक्टरला अटक केली. संबंधित बसही पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित बस यापूर्वी खराब झाली होती आणि दुरुस्तीसाठी ती ग्रेटर नोएडातील सूरजपूर परिसरातील वर्कशॉपमध्ये नेण्यात आली होती. दुरुस्ती झाल्यानंतर कुलदीप आणि संदीप ही रिकामी बस तिमारपूरकडे घेऊन जात होते. याच प्रवासादरम्यान परी चौक येथे त्यांची पीडित मुलीशी भेट झाली. परी चौक ते काश्मिरी गेट असा सुमारे ४७ किलोमीटरचा प्रवास बसने केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा