29 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरक्राईमनामालाईफ जॅकेट, सुरक्षा प्रमाणपत्राच्या अभावामुळे गेले २२ जीव

लाईफ जॅकेट, सुरक्षा प्रमाणपत्राच्या अभावामुळे गेले २२ जीव

प्रवाशांना लाइफ जॅकेट दिलेले नव्हते तसेच सुरक्षा सर्टिफिकेटही नव्हते.

Google News Follow

Related

शनिवारी संध्याकाळी केरळच्या मलप्पुरममध्ये बोट उलटून २२ लोकांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेमागे गर्दीचे कारण असू शकते परंतु आता काहीही पुष्टी करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या अहवालात नमूद केले की, प्रवाशांना लाइफ जॅकेट दिलेले नव्हते तसेच सुरक्षा सर्टिफिकेटही नव्हते.केरळच्या मलप्पुरममध्ये घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आलेल्या माहितीत २२ जणांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य सुरु आहे.

मलप्पुरम पोलिसांनी सोमवारी सांगितले की, बोट उलटण्याने २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. तथापि पोलिसांनी अद्याप या दुर्घटनेमागील कारणाची पुष्टी केलेली नाही आणि शोध आणि बचाव कार्य संपल्यानंतर तपास सुरू केला जाईल, असे ते म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटी मध्ये जास्त प्रमाणात गर्दी असल्याने बोट पाण्यात उलटली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.तसेच प्रवाशांना लाइफ जॅकेट दिलेले नव्हते आणि सुरक्षा सर्टिफिकेटही नसल्याचे पोलिसांनी सांगितले.अपघात झाल्यानंतर बोटीचा मालक नझर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययूएमएल) आमदार पीके कुनहालीकुट्टी यांनीही पीटीआयला सांगितले की,जहाज पलटी होण्यामागे गर्दीचे कारण असल्याचे मानले जात होते. नियमानुसार बोटींनी प्रवासासाठी संध्याकाळी ६ नंतर बाहेर पडायचे नसते परंतु या प्रकरणात नियमाचे उल्लंघन झाल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा:

इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार

अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!

संस्कृत, काश्मिरी, कोकणी भाषांमध्ये शब्दकोश प्रकाशित होणार

वृत्तानुसार, ३० हून अधिक जणांना घेऊन जाणारी ही मासेमारीची बोट शनिवारी संध्याकाळी ५ च्या अधिकृत डेडलाइनच्या पलीकडे जात होती जेव्हा ती संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ‘तनूर परिसरातील थुवलथीराम’ समुद्रकिनाऱ्याजवळील मुह्याजवळ उलटली.

अहवाल असेही सूचित करतो की, बोट कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय सेवा पार पाडत होती. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोट मालकाने पर्यटक सेवेसाठी मासेमारी बोटीचा उपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या अहवालानुसार, बोटीवरील प्रवाशांची नेमकी संख्या अद्याप कळू शकली नसली तरी ४० जण तिकीटांसह असून बोट कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय सेवा पार पाडत होती. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले नसल्याचे तपासात आढळून आले.

जिल्हा अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ज्या २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत त्यांची ओळख पटली आहे. घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) पोहोचले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतीय नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे.

व्हीआर प्रेमकुमार, डीसी, मलप्पुरम यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, नौदलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले असून शोध कार्य चालू आहे.   या घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५ जण पोहत जाऊन किनाऱ्यावर पोहोचले आहेत. शोधकार्यात वाचलेल्या १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील शोध मोहीम सुरू आहे.बोट दुर्घटनेत दाखल करण्यात आलेल्या मलप्पुरम जिल्ह्यातील तालुक रुग्णालयाला ”केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन” यांनी भेट देत रुग्णांची विचारपूस केली.

केरळचे महसूल मंत्री के राजन मलप्पुरम जिल्ह्यात जिथे ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी पोहोचले.ते पुढे म्हणाले, बोटीवरून प्रवास करणाऱ्यांची नेमकी संख्या निश्चित होऊ शकली नाही. मुख्यमंत्री सकाळी ९.३० वाजता येथे पोहोचतील. शोध मोहीम सुरू आहे. एनडीआरएफ, अग्निशमन आणि स्कूबा डायव्हिंग टीम शोध मोहीम राबवत आहेत.

नौदलाचे पथकही पुढे आले आहे. कोस्ट गार्ड काल पोहोचले. एनडीआरएफची दुसरी टीम देखील येथे पोहोचेल, पुढील तपास सुरु आहे.दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून राज्य सरकारने सोमवारी एक दिवसाचा शोक जाहीर केला असून सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा