27 C
Mumbai
Tuesday, August 16, 2022
घरक्राईमनामाधारावीत तरुण कबड्डीपटूची स्टंपने हत्या; संतप्त नागरिकांची निदर्शने

धारावीत तरुण कबड्डीपटूची स्टंपने हत्या; संतप्त नागरिकांची निदर्शने

Related

मुंबईतल्या धारावी परिसरातील कामराज नगरमध्ये राहणारा कबड्डीपटू विमलराज नाडर या २६ वर्षीय तरुणाची शुक्रवारी मध्यरात्री क्रिकेटच्या स्टंपने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली हाेती. पाेलिसांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार विमलराज याच्या हत्येमध्ये क्रिकेट स्टंप शिवाय धारधार हत्यारांचा देखील वापर करण्यात आला हाेता. गंभीर जखमी अवस्थेत विमलराज नाडर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पाेलिसांनी म्हटले आहे. मृताच्या कुटुंबात आई-वडील आणि भावाचा समावेश आहे.

संतप्त नागरिकांची निदर्शने

या हत्याकांडामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रविवारी धारावी पोलीस ठाण्यासमोर बॅनर, पोस्टर लावून हत्या झालेल्या कबड्डीपटूला न्याय देण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी माेठ्या संख्येने जमत निदर्शने करून कबड्डीपटूच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

जुन्या वैमनस्यातून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून दुपारी ३ वाजताच्या सुमारास आरोपी मल्लेश चिटकांडी व त्याच्या साथीदारांनी विमलराजच्या डोक्यात क्रिकेट स्टंपने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर विमलराज नाडर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी विमलराजला मृत घाेषित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा