31 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरक्राईमनामात्रिपुरात ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक, एजंटही ताब्यात!

त्रिपुरात ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक, एजंटही ताब्यात!

आगरतळा जीआरपी, रेल्वे संरक्षण दलाची कारवाई

Google News Follow

Related

त्रिपुरातील आगरतळा रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (७ जून ) रात्री झाली. पकडण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी माहिती दिली की हे सर्वजण रेल्वेने दिल्लीला जाण्याचा विचार करत होते.

आगरतळा सरकारी रेल्वे पोलिसचे (जीआरपीएस) प्रभारी अधिकारी तापस दास यांनी सांगितले की, जीआरपी, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि गुप्तचर विभागाच्या संयुक्त कारवाईत त्यांना अटक करण्यात आली. माहिती देताना त्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले बांगलादेशी बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते आणि ते रेल्वेने दिल्लीला जाण्याचा विचार करत होते.

याशिवाय, त्याच दिवशी आगरतळा रेल्वे स्थानकावरून आणखी एक बांगलादेशी घुसखोर आणि एका भारतीय दलालालाही ताब्यात घेण्यात आले आहे. श्यामल चंद्र बर्मन आणि अभिजित सरकार अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. बांगलादेशातील गायबंधा आणि त्रिपुराच्या खोवई जिल्ह्यातील त्रिशाबारी येथील हे रहिवासी आहेत.

हे ही वाचा : 

त्रिपुरा: बकरी ईदला गायींची कत्तल, चौघांना अटक!

कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रॅलीदरम्यान गोळीबार!

एक भारतीय म्हणून मी पंतप्रधानांच्या पाठीशी

अयोध्येत भाविकांची संख्या वाढली

तपासात असे दिसून आले की हे घुसखोर बेकादेशीरपणे भारतात शिरले आणि कोलकाताला जाण्याच्या तयारीत होते, यावेळी एजंट आगरतळा रेल्वे स्थानकावर आला होता. याच दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. आगरतळा जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, अशा घुसखोरांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. देशासह राज्यातून घुसखोरांना ताब्यात घेतले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा