उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उधोपुर गावात बकरीद दिवशी नमाज अदा करून परतलेल्या एका वृद्धाने स्वतःच स्वतःचा गळा चिरून आपली ‘कुर्बानी’ दिली. या घटनेबाबत ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मौलाना रजवी म्हणाले की, “अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्दैवी व हृदय पिळवटून टाकणारी आहे. याला कुर्बानीशी जोडणं अजिबात योग्य नाही. या घटनेबाबतची स्थिती आता स्पष्ट झाली आहे.”
त्यांनी सांगितले की, गळा चिरणाऱ्या वृद्धाची पत्नी म्हणते की, तो तंत्र-मंत्राच्या आहारी गेला होता. तो आजमगढमधील एका दरगाहला जात असे आणि त्याच्यावर भूत-प्रेताचा प्रभाव असल्याचं मानत असे. तो घरी परत आल्यावर जादू-टोणा करत असे. भूत-प्रेताच्या प्रभावामुळेच त्याने स्वतःचा गळा चिरला. मौलाना रजवी पुढे म्हणाले, “याला धार्मिक कुर्बानी मानणं चुकीचं आहे. अंसारी या वृद्धाच्या मनावर भूत-प्रेताचा परिणाम झाला होता. केवळ बकरीदच्या दिवशी असल्यामुळे त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. मात्र, त्याच्या मानसिकतेवर अंधविश्वासाचा प्रभाव होता. त्यामुळेच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना कुर्बानीच्या स्वरूपात सादर करणं चुकीचं आहे. इस्लाममध्ये माणसाची नाही, तर प्राण्यांची कुर्बानी दिली जाते.”
हेही वाचा..
त्रिपुरा: बकरी ईदला गायींची कत्तल, चौघांना अटक!
कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रॅलीदरम्यान गोळीबार!
एक भारतीय म्हणून मी पंतप्रधानांच्या पाठीशी
ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. उधोपुर गावात बकरीदच्या दिवशी नमाज अदा करून परतल्यानंतर, एका वृद्धाने स्वतःची ‘कुर्बानी’ दिली आणि एक पत्रही लिहिलं. त्या पत्रात म्हटलं आहे की, “माणूस बकऱ्याला आपल्या मुलासारखं वाढवतो, तोही जिवंत जीव आहे, तरी त्याची कुर्बानी दिली जाते. मी स्वतःची कुर्बानी अल्लाहच्या रसूलच्या नावानं देतोय. पोलिसांच्या माहितीनुसार, या व्यक्तीने अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली स्वतःचा गळा चिरला. त्याने कुटुंबीयांना आगाह करून ईश मोहम्मद नावाने पत्र लिहिलं होतं, ज्यात त्याने आपल्या निर्णयाचा उल्लेख केला होता.
