26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरक्राईमनामाजयपूरमध्ये ५०० रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना अटक

जयपूरमध्ये ५०० रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना अटक

ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी ३९४ रोहिंग्या हे निर्वासित

Google News Follow

Related

जयपूर पोलिसांनी बेकायदेशीर स्थलांतरित आणि सक्रीय गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत कारवाई दरम्यान जयपूर पोलिसांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांसह ५०० जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशाने या मोहिमेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांचीही ओळख पटवण्यात आली आहे.

जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हणून बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी ही मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेत कारवाई करताना अनेक अवैध स्थलांतरित आढळले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी ३९४ रोहिंग्या हे निर्वासित आहेत, तर इतरांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.

पोलिस आयुक्त म्हणाले की, “जयपूर पोलिसांनी आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी केली जाईल,” असे ते म्हणाले.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईमध्ये त्याच्या निवासस्थानी बांगलादेशी स्थलांतरितांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींचा मुद्दा चांगलाच तापला आहे. देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

हे ही वाचा : 

महाकुंभला विमानाने जाताय? आता भरा ५० हजार

मजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख

त्रिपुरात ५ दिवसांत १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, तस्करही ताब्यात!

दरम्यान, महाराष्ट्रात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न उचलून धरला असून जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला आहे. राज्यात प्राप्त अर्जांची आकडेवारी त्यांनी जारी केली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ साली एकूण २,१४,३०७ अर्ज प्राप्त झाले. यातील ५,२८९ अर्ज फेटाळण्यात आले, तर १,२९,९०६ प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. ७४,९४० अर्ज मंजूरही करण्यात आले. यानंतर आता तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही प्रमाणपत्र देऊ नये, असा आदेश महाराष्ट्र सरकारने जारी केल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा