30.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामानोकरी मिळणार नाही, म्हणत तरुणाने आठव्या मजल्यारून उडी मारून दिला जीव

नोकरी मिळणार नाही, म्हणत तरुणाने आठव्या मजल्यारून उडी मारून दिला जीव

Google News Follow

आपल्याला नोकरी मिळणार नाही या भीतीने पिंपरीच्या सुसगाव येथील एक उच्चशिक्षित तरुणाने शुक्रवारी सकाळी आपल्या सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. अक्षय अमोल माटेगावकर असे या २१ वर्षीय तरुणाचे नाव असून तो सुसगाव येथे माऊंट युनिक सोसायटीमध्ये राहत होता. मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे अशी चिठ्ठी अक्षय याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली आहे. या घटनेमुळे या भागातील नागरिकांना धक्का बसला असून माटेगावकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच हिंजेवाडी पोलिस घटना स्थळी पोहचले असता त्यांना अक्षयने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. आपल्याला कोणतीही नोकरी मिळणार नाही या भितीने आपण आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत त्याने नमूद केले होते. पोलिसांनी अक्षयचा मृतदेह औध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अक्षय हा आपले आई , वडिल आणि बहिण यांच्यासह सुसगाव भागात राहतो. अक्षय हा सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. अक्षयचे वडिल अमोल माटेगावकर हे प्रिन्स्टन ब्लूमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर असून भारतातील प्रमुखही आहेत. आई मीनल माटेगावकर मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई येथे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख असून बहिण आकांक्षा माटेगावकर एमआयटीमध्ये डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. एका उच्चशिक्षित व सधन कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही अक्षय याने आत्महत्या का केली याबद्दल आश्चर्य आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

नेमक्या कारणचा पोलिस करत आहेत तपास

अक्षयने मृत्यूपूर्वी आपल्याला नोकरी मिळणार नाही या भीतीने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले होते. परंतु तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्यासाठी केवळ नोकरीची भीती होती, तो तणावग्रस्त होता की अन्य काही कारण यामागे आहेत याचा पोलिस तपास घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा