27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरदेश दुनियाहमीद अन्सारी - पाक पत्रकाराचा फोटोच केला व्हायरल!

हमीद अन्सारी – पाक पत्रकाराचा फोटोच केला व्हायरल!

Related

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व आयएसआय एजंट आणि पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांच्यातील कथित संबंधांचे प्रकरण चिघळत चालले आहे. तत्कालिन उपराष्ट्रपती अन्सारी यांनी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना भारतात आमंत्रित केले होते. दहशतवादावरील परिषदेसाठी हे आमंत्रण पाठवले होते असे बोलले जाते. पाकिस्तानच्या या पत्रकाराने यूट्युबवरील एका मुलाखतीमध्ये २००५-११ या काळात आपण अनेकदा भारतात आलो होतो आणि आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी अनेक प्रकारची माहिती गोळा केली असा खुलासा केला आहे. या खुलाशावरून आता भाजपने माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तर थेट या भेटीचे छायाचित्र पत्रकार परिषदेत सादर करून पुरावाच सादर केला आहे. हे छायाचित्र ट्विटरवर शेअर केल्यामुळे पुन्हा या वादाला नवे वळण लागले आहे.

एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चित्रात हमीद अन्सारी मध्यभागी बसलेले दिसत आहेत. पाकिस्तानी पत्रकार आणि पाकिस्तानची एजंट नुसरत मिर्झाही याच व्यासपीठावर बसले असल्याचे छायाचित्र दाखवून भाटिया यांनी माजी उपराष्ट्रपतींनी ही माहिती लपवली का ? असा सवाल करत अशा प्रकारे काँग्रेसच्या तारा पाकिस्तानशी जोडल्या जातात , तिथूनच नाळ जोडली गेली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी वादात सापडले आहेत. या वादातून बाहेर पडणे त्यांना सोपे जाणार नाही.

अन्सारी आणि नुसरत मिर्झा यांच्यात काय नाते

पाकिस्तानी पत्रकार आणि आयएसआयचा गुप्तहेर नुसरत मिर्झा याने दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावल्याचा दावा केला आहे. परंतु अन्सारी यांनी दावा केला आहे की त्यांनी नुसरतला कधीही आमंत्रित केले नाही, परंतु परिषदेसाठी उपराष्ट्रपती कार्यालयातून फोनवर, आयोजकांना मिर्झा यांना बोलावण्याचा सल्ला देण्यात आला. ते असे का म्हणाले, अन्सारी आणि नुसरत मिर्झा यांच्यात काय नाते आहे, असा सवाल भाटिया यांनी उपस्थित केला आहे. अन्सारी यांनी चर्चा केलेल्या परिसंवादाच्या आयोजकांपैकी एकाचे विधानही आले आहे, जो सर्वोच्च न्यायालयातील वकील आहे. माजी उपराष्ट्रपतींनी यासाठी फोन केल्याचे त्यांनी म्हटले असल्याचा दावा भाटिया यांनी यावेळी केला.

गुप्तचर यंत्रणेकडून माहिती घेतली होती का ?

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चित्रात हमीद अन्सारी मध्यभागी बसलेले दिसत आहेत. पाकिस्तानी पत्रकार आणि पाकिस्तानचा एजंट नुसरत मिर्झाही याच व्यासपीठावर बसला आहे. मग अन्सारी यांच्यासोबत बसण्यास नकार का देण्यात आला नाही, गंभीर आरोप करत भाटिया म्हणाले की, असा कोणताही कार्यक्रम जर आयोजित करण्यात आला तर याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळणे आवश्यक आहे. या परिषदेमध्ये तशी परवानगी घेतली होती का असा प्रश्नही भाटिया यांनी यावेळी केला.

हे ही वाचा:

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

कॉंगेस आयएसआयची एजंट आहे का?

देशात संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम असेल, तर प्रोटोकॉलनुसार त्या कार्यक्रमाला कोणाला आमंत्रित केले आहे, याची माहिती कार्यालय घेते. या स्थितीत पाकिस्तानी नागरिकांनी देशात घुसखोरी करून भारताच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धक्का लावावा, अशी काँग्रेसची इच्छा होती का? काँग्रेस आयएसआयची एजंट आहे का? अन्सारी हवे असते तर ते नुसरत मिर्झाला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारू शकले असते. किंवा किमान व्यासपीठावर बोलावणे तरी टाळता आले असते याकडे भाटिया यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, ११ डिसेंबर २०१० रोजी आपण दहशतवादावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि दहशतवादावरील मानवी हक्कांवरील ज्युरिस्ट्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले होते. परिषदेसाठी निमंत्रितांची यादी आयोजकांकडून तयार केली जाते, ही परंपरा आहे. मी नुसरत मिर्झाला कधीही आमंत्रण दिले नाही किंवा त्याला भेटले नाही असे स्पष्ट करून अन्सारी यांनी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. परंतु भाटिया यांनी बैठकीचे छायाचित्रच ट्विटरवर शेअर करून अन्सारींच्या विधानातील हवा काढून टाकली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा