29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामाशिक्षिकेने एका क्लिकवर गमावले २१ लाख

शिक्षिकेने एका क्लिकवर गमावले २१ लाख

Google News Follow

Related

व्हाट्सअँप आणि घोटाळ्यांची कहाणी, ऑनलाईन प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना काळापासून साधारणतः सर्वच नागरिक इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात लूट केल्याचे दिसून येते. अशीच एक घटना आंध्रप्रदेश राज्यात घडली आहे. शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षेकेला व्हाट्सअँपवर एक लिंक आली लिंक ओपन केली असता खात्यातून २१ लाख रुपये वळते झाले. संबंधित शिक्षिकेने सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकी बद्दल गुन्हा नोंदवला आहे.

आंध्रप्रदेश राज्यातील अण्णामय्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडून आला आहे. वरलक्ष्मी या निवृत्त शिक्षिका आहेत. त्याच्या व्हाट्सअँपवर अनोळखी नंबर वरून एक संदेश आला, त्यात एक लिंक दिलेली होती. वरलक्ष्मी यांनी लिंक ओपन करून पाहिले असता, त्यांचा फोन हॅक झाला. काही वेळा नंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे वळते झाल्याचा संदेश आला, वरलक्ष्मी यांना वारंवार असे संदेश येऊ लागले. त्याबद्दल त्यांनी बँकेत चौकशी केली असता, टप्प्याटप्प्याने बँक खात्यातून २१ लाख रुपयांवर सायबर चोरटयांनी डल्ला मारल्याचे समजले.

हे ही वाचा:

यूपी साकारला १८ फुटी ‘स्वर्ण गणेश’

युक्रेनवरील रशियाच्या रॉकेट हल्ल्यात २२ ठार

मुंबईच्या खड्ड्यांतली ‘मलई’ येत्या दोन वर्षांत बंद

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल ही माहिती आली समोर

या संदर्भात पोलीस अधिकारी मुरलीकृष्ण यांनी सांगितले की, अण्णामय्या जिल्ह्यातील मदनपल्ली येथील रहिवासी असेलल्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांना व्हाटसअँपवर आलेली लिंक अनेकदा उघडल्याने हा प्रकार घडला आहे. सायबर चोरांनी फोन हॅक करून काही वेळा नंतर २१ लाख रुपये लंपास केले. संबंधित अज्ञान चोरट्यांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शोधमोहिमेस सुरुवात केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा