33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामापालघर बलात्कार प्रकरणात उपसरपंचावर कारवाई

पालघर बलात्कार प्रकरणात उपसरपंचावर कारवाई

नशेच्या आहारी तरुणांचा, मुलीवर बलात्कार

Google News Follow

Related

पालघर जिल्ह्यातील माहीम येथे १६ वर्षीय मुलीचे तरूणीचे अपहरण करून, तिच्यावर ९ नराधमांनी तब्बल १८ तास आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालघरसह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पडसादामध्ये पालघरच्या स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकरणामध्ये गावच्या उपसरपंचानी पीडित व्यक्तीच्या वडिलांना काही हजारो रुपयांच्या आमिष देऊन ही केस मागे घेण्यासाठी धमकावले असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित प्रकरण उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी यांनी हे प्रयत्न उधळून लावला आहे.

देशासह महाराष्ट्रभर पालघरमध्ये झालेल्या या प्रकरणाचा तीव्र पडसाद उमटत आहे. संबंधित प्रकरणातील आरोपीना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. प्रकरणातील ९ व्या आरोपीला पकडण्यात आले असून गुरुवारी त्यांना पालघर न्यायालयात हजर करण्यात आले. या स्थानिक आरोपीना वाचवण्यासाठी नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. तर माजी उपसरपंचाणी पीडितेच्या वडिलांना काही हजार रुपयांचे आमिष देऊन, केस मागे घेण्यासाठी धमकावले असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित उपसरपंचाला पोलिस अधिकारी पाडवी यांनी दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तर आरोपींच्या या कृत्या बद्दल पोलिसांनी पॉस्को, अपहरण आदीसह आठ विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

हे ही वाचा : 

नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

२२ डिसेंबर राष्ट्रीय गणितज्ञ दिवस

लग्नासाठी मुलगी द्या, म्हणत सोलापुरात तरुणांचे आंदोलन

पालघर जिल्ह्यातील माहीम तालुक्यामधील या घटनेची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुमोटो दाखल करण्याची मागणी केली आहे. तर नागरिकांनी या परिसरात अशा घटना नेहमीच घडत असल्याची तक्रार केली. येथील अल्पवयीन बालकांसह तरुणांमध्ये दारूसहा ड्रग नशेचे सेवन छुप्या पद्धतीने करत असल्याचे मत गावकरी मंडळीनी मांडले. त्यामुळे तरुणांचे भविष्य उधवस्त करणाऱ्या ड्रग रॅकेटचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा