33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरक्राईमनामाफोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

फोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या दौऱ्यादरम्यानची घटना

Google News Follow

Related

मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी आखून दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन न करणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलेचं महागात पडले आहे. मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉलचे पालन न केल्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये ही घटना घडली आहे. कारवाई म्हणून त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये सध्या नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कोटद्वारमध्ये आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी म्हणून दौरा केला. यावेळी तैनात असलेले एएसपी प्रोटोकॉल विसरले आणि फोनवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपत्तीचा आढावा घेण्यासाठी कोटद्वार जिल्ह्यात पोहोचले होते. मुख्यमंत्री धामी हेलिकॉप्टरमधून कोटद्वारमध्ये उतरले तेव्हा एएसपी शेखर सुयाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आले होते. मात्र यादरम्यान एएसपी शेखर सुयाल प्रोटोकॉल विसरले. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल विसरून मुख्यमंत्री धामी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतरही ते फोनवर बोलतच राहिले आणि फोनवर बोलतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले.

हे ही वाचा:

अंतिम पंघलने पुन्हा जिंकले विश्वविजेतेपद; २० वर्षांखालील किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !

राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात

राज्याचे मुख्यमंत्री समोर असताना अतिरिक्त एसपी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फोनवर बोलत राहतो, ही कृती मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल मोडल्याची मानली जाते. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एएसपी शेखर सुयाल यांना एएसपी कोटद्वार येथील पदावरून हटवून त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. ही पोस्टिंग पोलिस खात्याची शिक्षा म्हणून मानली जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा