चेन्नई विमानतळावर सोमवारी एक मोठा ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ (२०१९) या बॉलिवूड चित्रपटात छोटी भूमिका साकारणारा अभिनेता विशाल ब्रह्मा याला ४० कोटी रुपयांच्या मेथाक्वालोन (Methaqualone) या अमली पदार्थासह महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली आहे.
आसामचा रहिवासी असलेला ३२ वर्षीय ब्रह्मा, AI ३४७ विमानाने सिंगापूरहून चेन्नईला परतला होता. विमानतळावर त्याच्या सामानाची तपासणी करताना एका ट्रॉली बॅगमध्ये मेथाक्वालोन या प्रतिबंधित औषधाचा मोठा साठा आढळून आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, ब्रह्माला एका नायजेरियन टोळीने अमिष दाखवून फसवले. पैशांची गरज असल्याने, त्याला कंबोडियाला सुट्टीसाठी जाण्याचे आमंत्रण देण्यात आले आणि परतताना त्याच्याकडून ड्रग्जची तस्करी करवून घेतली गेली. अधिकार्यांचे म्हणणे आहे की या कारवाईमागे एक आंतरराष्ट्रीय नायजेरियन ड्रग्ज रॅकेट सक्रिय असून, तपासाचा मुख्य उद्देश त्या टोळीपर्यंत पोहोचणे आहे. यामुळे तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी, कॉलीवूड अभिनेते कृष्णा आणि श्रीकांत यांना देखील अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. जूनच्या सुरुवातीला नाईट क्लबमध्ये झालेल्या भांडणातून उगम पावलेल्या या तपासात ड्रग्ज तस्करी, नोकरी घोटाळे, जमीन हडपणे आणि राजकीय व पोलीस संपर्कांचा गैरवापर या बाबींचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
हे ही वाचा :
यूपीआय व्यवहारांवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव नाही
ट्रॉफी चोरीनंतर मोहसीन नक्वींनी बीसीसीआयसमोर रगडले नाक, माफी मागत म्हणाले…
मलाडमध्ये खोटे पोलीस वाहन, वर्दीसह शूटिंग
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत
पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांचाही सहभाग
प्रसाद नावाच्या व्यक्तीने, पोलिस खात्यातील ओळखी वापरून लोकांचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅक करून त्यांना धमकावल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मदुराई येथील सशस्त्र राखीव पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल सेंथिल यालाही अटक करण्यात आली.







