34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामावसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड

वसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड

Google News Follow

Related

वसईत एका ऍडव्होकेटच्या घरावर धर्मांध मुस्लिमांना दगडफेक करून नंतर त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एक कथित आक्षेपार्ह मेसेज वकील ओझा यांनी फॉरवर्ड केल्यावरून त्या वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांच्या १००-१५० लोकांच्या गटाने हल्ला केला आणि दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओझा या वकिलाची गाडीही या हल्ल्यात फोडण्यात आल्याचाही आरोप आहे.

या वकिलांविरोधात आधी या मेसेजसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाली, एफआयआर करण्यात आला. त्यावर त्यांनी अटकपूर्व जामीनही मिळविला. मात्र त्यानंतर या वकिलाच्या घरावर हा हल्ला झाल्यामुळे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न काहीजण हेतूपुरस्सर करत असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात वसई पोलिस स्टेशनचे डीसीपी संजय पाटील यांनी म्हटले आहे की, धार्मिक भावनांना दुखावल्यासंदर्भात काही लोक पोलिस ठाण्यात आले होते. त्यांचे निवेदन घेतले आहे. ज्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या ते त्यातील साक्षीदार होतील. आता कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक आहे. ज्यांची चूक आहे, त्यावर कायदेशीर कारवाई होईल.

यासंदर्भात वकील ओझा यांनी स्थानिक पत्रकारांशी केलेल्या संवादात सांगितले की, ज्या मेसेजबद्दल तक्रार आहे तो अनेकवेळेला फॉरवर्ड झालेला मेसेज मी चार ते पाच तेही वकील असलेल्या सहकाऱ्यांना पाठवला. आता तो मेसेज माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्यांपर्यंत कुणी पोहोचवला त्याच्यावरही कारवाई करा. मी चार ते पाच व्यक्तीव्यतिरिक्त आणखी कुणालाही मेसेज पाठवला नाही. हे एक कारस्थान रचण्यात आले आहे. हिंदुंवर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे. मी जो मेसेज पाठवला तो एका मुस्लिम व्यक्तीने पाठवल्याचे त्यात दिसून येते आणि त्याचे नावही एफआयआरमध्ये लिहिले आहे. हा मेसेज जवळपास १० वर्षापूर्वीपासून सोशल मीडियावर फिरत आहे, असे पोलिसांचेच म्हणणे आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेशी बात आणि चीनला लाथ

‘आम्हाला उद्घाटनाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा’

देशभर सुरु देवीचा जागर! चैत्र नवरात्राला प्रारंभ

आमदार अतुल भातखळकरांच्या उपस्थितीत कांदिवलीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

 

ओझा यांच्यासोबत असलेल्या इतर वकील सहकाऱ्यांनी म्हटले की, ओझा यांची तक्रार करण्यात आली तरीही त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. हल्ला करण्याचा अधिकार कुणी दिला या लोकांना.

ओझा यांनी हा मेसेज आपल्या जवळच्या चार-पाच लोकांना पाठवलेला असताना तो अनेकापर्यंत पोहोचविण्याचे काम कुणी केले आणि त्यातून वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न कुणी केले, याचे उत्तरही शोधावे लागेल, असेही ओझा यांच्यासोबत असलेल्या वकील व नागरिकांचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा