33 C
Mumbai
Sunday, May 15, 2022
घरराजकारणआमदार अतुल भातखळकरांच्या उपस्थितीत कांदिवलीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

आमदार अतुल भातखळकरांच्या उपस्थितीत कांदिवलीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Related

राज्यभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजे आजपासूनच राज्यातील करोना संदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सगळीकडे मोठ्या उत्सहात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली मतदार संघात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत मध्ये तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता. पारंपारिक वेशभूषा करून नागरिकांनी मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. या स्वागतयात्रेत आमदार अतुल भातखळकर हे स्वतः उपस्थित होते. ढोल ताशा पथक, लेझीम पथकाने स्वागत यात्रेची रंगत वाढवली.

हे ही वाचा:

राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….

श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू

आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी

तुझे तेज अंगी शतांशी जरीही

कांदिवली येथील स्वागत यात्रे प्रमाणे मुंबईत इतरही अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. निर्बंधमुक्त महाराष्ट्रानंतरचा हा पहिलाच सण होता आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात हिंदू नव वर्षाचे स्वागत केले. राजकारण्यांनीही आपल्या कुटुंबासोबत गुढीपाडवा साजरा केला. तर डोंबिवली, ठाणे, गिरगाव, कल्याण येथेही मोठ्या उत्साहात स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,980चाहतेआवड दर्शवा
1,881अनुयायीअनुकरण करा
9,280सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा