25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरक्राईमनामाआफताबनंतर आता रियाझ...हिंदू तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला नदीत

आफताबनंतर आता रियाझ…हिंदू तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला नदीत

जिम ट्रेनर असलेल्या रियाझला केली अटक

Google News Follow

Related

उर्वशी या तरुणीची रियाझ नावाच्या प्रियकराने गळा आवळून मृतदेह नदीच्या पात्रात फेकून दिल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने या खुनाची उकल करून जिम ट्रेनर असलेल्या रियाज खान आणि डिलेव्हरी बॉय इम्रान शेख या दोघांना अटक केली आहे. मृत तरुणी ही नवी मुंबईत राहणारी असून मारेकरी रियाज गोवंडीतील देवनार परिसरात राहणारा आहे.

नवीमुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारी उर्वशी वैष्णव (२७) या तरुणीचा मृतदेह पनवेल तालुका पोलिसांना १४ डिसेंबर रोजी धामण गावाजवळील गाढी नदीच्या पात्राजवळ आढळला होता. नवी मुंबई गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी मिळून आलेल्या सँडल वरून उर्वशीची ओळख पटवून मारेकऱ्याचा शोध घेतला असता मारेकरी हा उर्वशी हिचा प्रियकर रियाज खान (३६) हा असल्याची माहिती तपासात समोर आली.

हे ही वाचा:

लहान मुले सोबत असलेल्या महिलांना मध्य रेल्वेची ‘भेट

पंतप्रधान मोदींचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणाला मिळाला सन्मान

कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानच्या रमीझ राजांनी खुर्ची गमावली

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; येत्या काळात लाखो मृत्यू होण्याची भीती

गुन्हे शाखेने रियाज खानची महिती काढली असता रियाज हा गोवंडीतील देवनार या ठिकाणी राहण्यास असून तो जिम ट्रेनर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रियाजचा शोध घेऊन घणसोली येथे लपून बसलेल्या रियाज याला अटक करण्यात आली, तसेच त्याला या हत्याकांडात मदत करणारा इम्रान शेख या दोघांना अटक केली आहे.

उर्वशी आपल्या मागे लग्नाचा तगादा लावत होती, मात्र मला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते म्हणून तिची मोटारीतच गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह धामण गावातील गाढी नदीच्या पात्रात फेकला अशी कबुली रियाज याने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा