27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरक्राईमनामासलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानवरून आणली जाणार होती शस्त्रे

सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानवरून आणली जाणार होती शस्त्रे

चार जणांना अटक

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता सलमान याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चौघांनी सलमान खानच्या कारवर पनवेलमध्येच हल्ला करण्याचा कट आखला होता. शिवाय या कटाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे.

माहितीनुसार, पनवेलमध्ये सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधील शस्त्र पुरवठा करणाऱ्याकडून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. धनंजय सिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि झिशान खान उर्फ जावेद खान अशी चार अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा कॅनडामध्ये असलेला चुलत भाऊ अनमोल बिष्णोई आणि सहकारी गोल्डी ब्रार याने एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करून अभिनेता सलमान खानला मारण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सलमान खानची गाडी थांबवणे किंवा फार्महाऊसवर हल्ला करणे हा त्यांचा उद्देश होता.

या प्रकरणी आयपीसीच्या कलम ११५, १२० (बी) आणि ५०६ (२) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार, अजय कश्यप उर्फ धनंजय तपसिंग, रोकी शूटर, सतीश कुमार, सुखा शूटर, संदीप बिष्णोई उर्फ गौरव भाटिया, रोहित गोधरा, वसीम चेना, डोगर, सिंटू कुमार, विशाल कुमार, संदीप सिंह, रियाझ उर्फ चंदू, कमलेश शाह आणि इतरांना आरोपी केले आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेस नकारात्मक स्थितीत’

इस्रायली कंपनीकडून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; भाजपाविरोधी अजेंडा चालवल्याचा आरोप

लोकशाहीच्या उत्सवाचा अंतिम टप्पा; ५७ जागांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेले चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. यापूर्वी १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुंबईतील सलमान खान याचे वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करत आरोपींना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा