ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास अधिक तीव्र केला आहे. आतापर्यंत भारतातील विविध राज्यांमधून अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर पाकिस्तानला गुप्तचर माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. त्याच क्रमाने, आता राजस्थानमधील पहाडी गावातील गंगोरा भागातून एका संशयिताला पकडण्यात आले आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने गंगोरा परिसरातून कासिम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कासिमच्या पाकिस्तानशी संबंधाचे पुरावेही सापडले आहेत, ज्याच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयबीने पहाडी गावातील गंगोरा भागातून कासिम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, सुरक्षा एजन्सीला कासिमच्या पाकिस्तान कनेक्शनचे पुरावे सापडले आहेत. कासिमने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याचेही कळले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो एका पाकिस्तानी महिलेशी बोलत असे. कासिम पूर्वी दिल्लीत राहत होता. अचानक तो गावाला आला आणि मग त्याने पाकिस्तानचा व्हिसाही काढला. यानंतर, कासिम पाकिस्तानला गेला, जिथे त्याने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले.
कासीमला ताब्यात घेतल्यानंतर सध्या त्याची चौकशी सुरू आहे. याच्यासोबत आणखी कोणी आहे का?, याचाही तपास पथक करत आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक राज्यातून अशा गुप्तहेरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन उघड झाले आहे. या प्रकरणी सुरक्षा पथके अलर्ट मोडवर आहेत. याच दरम्यान काल (२४ मे) उत्तर प्रदेशातील मथुरेत ‘मेड इन पाकिस्तान’ पंखा मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संताच्या वेशात एक महिला पंखा दुरुस्त करण्यासाठी आली होती. दुकानदाराला पंख्यावर ‘मेड इन पाकिस्तान’ लिहिलेले दिसताच पोलिसांना याची माहिती दिली.
हे ही वाचा :
दिल्लीत मुसळधार पावसामुळे २०० हून अधिक विमानांना फटका!
उत्तर प्रदेश: भारताविरोधी घोषणा देणाऱ्या दोन मुस्लीम तरुणांच्या मुसक्या आवळल्या!
परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्गाचा नामफलक पुन्हा बसवला
पोलिसांना अद्याप त्या महिलेबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस आता पंखा आणणाऱ्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अनेक लोकांची चौकशीही सुरू केली आहे. हे प्रकरण मथुरेतील गोवर्धन पोलीस स्टेशन हद्दीतील राधाकुंड चौकीजवळील परिक्रमा मार्गाचे आहे.
