उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये शनिवारी (२४ मे) दोन स्थानिक तरुणांना सोशल मीडियावर देशविरोधी व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली. या प्रकरणाबाबत एसएचओ अभिषेक कुमार म्हणाले की, अटक केलेल्या तरुणांची ओळख इरफान आणि वाजिद शाह अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ते ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देताना दिसत होते. एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये लोकांच्या जीभ कापण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. एसएचओ अभिषेक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये संताप पसरला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, इरफान आणि वाजिद शाह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम ३५३ (२) (सार्वजनिक उपद्रव) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोन जप्त केले आणि हा व्हिडिओ कधी आणि कुठे बनवला गेला याचा तपास करत आहेत.
एसएचओ अभिषेक कुमार म्हणाले, हे प्रकरण सोशल मीडियावरील फक्त एका व्हिडिओपुरते मर्यादित नाही तर देशाच्या एकता आणि अखंडतेविरुद्ध द्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या कटाचा भाग असल्याचे दिसते. दरम्यान, स्थानिक लोकांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कृत्यामागे काही संघटित कट आहे का, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
हे ही वाचा :
परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्गाचा नामफलक पुन्हा बसवला
मुस्लीम वस्तीत टीळा लावून आलास तर गोळ्या घालीन!
“पैसे कमवण्यासाठी अमेरिका दोन देशांना लढवते” पाकचे संरक्षण मंत्री असे का म्हणाले?
मोहम्मद युनुस राहणार कि जाणार?, दोन तासांच्या बैठकीत काय झाले!
