दोन वर्षांपूर्वी उद्योगपती गौतम अदाणी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. अमेरीकी कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च एण्ड शॉर्ट सेलिंग फर्मने अदाणी समुहाच्या विरोधात आघाडी उघडली होती. हा हल्ला इतका जबरदस्त होता की जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले अदाणी २२ व्या क्रमांकावर ढकलले गेले. सुपारी देऊन एखाद्याचा गेम वाजवतात तसा हा प्रकार होता. ज्याने सुपारी वाजवली त्याचे नाव समोर आले. परंतु ती कोणाच्या सांगण्यावरून वाजवली हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. ज्याने कोणी हे केले त्यामागे फार दूरचा विचार होता हे निश्चित. ऑपरेशन सिंदूरनंतर गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर एक नजर टाकली तर आपल्या या खेळी मागील कार्यकारण भाव लक्षात येऊ शकतो.
