मध्य प्रदेशच्या रतलाममधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रतलाम जिल्ह्यातील जावरा शहरात एका मुस्लिम तरुणाने हिंदू जागरण मंचचे नेते सूरज महावार यांना थप्पड मारल्याचा प्रकार घडला आहे आणि जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी जावरा शहर पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला. आंदोलकांनी प्रशासनाकडे स्पष्टपणे मागणी केली आहे की आरोपी असीम कुरेशीची मिरवणूक काढावी आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवावा. २४ तासांत कठोर कारवाई न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
जावरा येथील मुगलपुरा परिसरात ही घटना घडली. शुक्रवारी (२३ मे) संध्याकाळी हिंदू जागरण मंचचे नेते सूरज महावार परिसरातून जात असताना आरोपी असीम कुरेशीने त्यांच्या टीळा लावण्यावर आक्षेप घेतला आणि म्हणाला, हा मुस्लिम परिसर आहे, इथे टीळा लावून येऊ नकोस. नाहीतर घरात पिस्तूल आहे, मी तुला गोळी घालेन. यानंतर, वाद झाला आणि आरोपीने सूरज महावारला चापट मारली आणि ढकलले. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, ज्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, जावरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जावराचे सीएसपी दुर्गेश आर्मो म्हणाले की, आरोपी असीम, त्याचे वडील, आई आणि बहिणीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि अटकेची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने सर्वसामान्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
हे ही वाचा :
“पैसे कमवण्यासाठी अमेरिका दोन देशांना लढवते” पाकचे संरक्षण मंत्री असे का म्हणाले?
पाकच्या सिंधमध्ये बेनझीर भुट्टो यांच्या मुलीच्या ताफ्याला घेराव, काठ्यांनी हल्ला
मोहम्मद युनुस राहणार कि जाणार?, दोन तासांच्या बैठकीत काय झाले!
पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या अभिनेत्यावर रुपाली गांगुली संतापली म्हणाली, खालच्या दर्जाचे…
दरम्यान, या घटनेनंतर हिंदू संघटनांमध्ये संताप आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी ओव्हरब्रिज रोखला. प्रचंड गोंधळामुळे येथे ६ पोलिस ठाण्यांचे सैन्य तैनात करण्यात आले आहे.
