28 C
Mumbai
Friday, June 20, 2025
घरक्राईमनामापाकच्या सिंधमध्ये बेनझीर भुट्टो यांच्या मुलीच्या ताफ्याला घेराव, काठ्यांनी हल्ला

पाकच्या सिंधमध्ये बेनझीर भुट्टो यांच्या मुलीच्या ताफ्याला घेराव, काठ्यांनी हल्ला

कालवा प्रकल्पाला विरोध करणारे निदर्शक सरकारविरोधात आक्रमक

Google News Follow

Related

एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जबरदस्त ताणले गेले असताना दुसरीकडे पाकिस्तानला अंतर्गत कलहाचा देखील सामना करावा लागत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असतानाचं इतर प्रांतांमध्येही अशांतता पसरली आहे. अशातच सिंधमध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची कन्या आसिफा भुट्टो झरदारी यांचा ताफा अडवण्यात आल्याची घटना घडली आहे.

पाकिस्तान राष्ट्रीय असेंब्लीच्या सदस्या आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या कन्या आसिफा भुट्टो झरदारी यांचा ताफा निदर्शकांनी अडवल्याने खळबळ उडाली. त्यांचा ताफा कराचीहून सिंधमधील नवाबशाहला जात होता. यावेळी जामशोरो टोल नाक्यावरून जात असताना कालवा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या निदर्शकांनी त्यांचा ताफा रोखून ठेवला. शिवाय त्यांच्या ताफ्यातील वाहनांवर निदर्शकांनी काठ्यांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे महामार्गावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

वादग्रस्त कालवा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेतीच्या विरोधात आंदोलन करत असल्याचे निदर्शकांनी सांगितले. त्यांनी हा प्रकल्प शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताच्या विरुद्ध असल्याचे म्हटले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेदरम्यान, सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई केली आणि आसिफा झरदारी यांचे वाहन सुरक्षित ठिकाणी नेले आणि ताफ्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

हे ही वाचा : 

IPL 2025: शेवटचा सामना, मनापासून जिंकायचंय

रोहित, विराट आणि अश्विनच्या निवृत्तीवर अजीत अगरकर भावुक

आयएसआयच्या संपर्कात असलेल्याला कच्छमधून ठोकल्या बेड्या

आरसीबीचा पराभव, उथप्पाचा दावा – “पंजाब किंग्स बनू शकते टेबल टॉपर!”

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंधमधील जामशोरोचे एसएसपी जफर सिद्दीकी यांनी सांगितले की, काफिला एका मिनिटापेक्षा कमी वेळासाठी थांबवण्यात आला आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. ते म्हणाले, जर कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर पोलिस योग्य ती कारवाई करतात. तसेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही एसएसपींनी दिली. सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
252,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा