‘अनुपमा’ या लोकप्रिय टीव्ही शोमधून घराघरात आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रूपाली गांगुली आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. अभिनयासोबतच रुपाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अशा स्टार्सपैकी एक आहे जी प्रत्येक मुद्द्द्यावर उघडपणे बोलते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्यावर रुपाली गांगुलीने संताप व्यक्त केला आहे.
खरंतर, हे दुसरे तिसरे कोणी नसून साऊथ सुपरस्टार प्रकाश राज आहेत. शुक्रवारी (२३ मे) प्रकाश राज यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, जे पाहून अभिनेत्री रूपाली गांगुली यांचा पारा चढला. प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक व्यंगचित्र शेअर केले होते. त्यांचे हे व्यंगचित्र ऑपरेशन सिंदूरशी संबंधित होते, ज्यामध्ये रक्तदान शिबिराऐवजी ‘सिंदूर दान शिबिर’ असे लिहिले होते. हे पोस्ट करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काहीही नाही, माझ्या नसांमध्ये फक्त निवडणुका धावत आहेत.’
हे ही वाचा :
श्रीकांत रविवारी फायनलमध्ये ली शि फेंगशी भिडणार
केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम केले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही!
IPL 2025: शेवटचा सामना, मनापासून जिंकायचंय
गुजरातमधील बनासकांठामध्ये पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या
दरम्यान, अभिनेते प्रकाश राज यांच्या पोस्टवर रूपाली गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आणि अभिनेत्यावर राग व्यक्त केला. रुपाली यांनीही ही पोस्ट रिट्विट केली आणि लिहिले, ‘खरोखर खूप खालच्या दर्जाचे प्रकाश जी. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षाही हे कमी आहे. रुपाली गांगुलीचे हे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि यावर युजर्सही प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, याआधीही प्रकाश राज यांना त्यांच्या पोस्ट आणि कमेंट्समुळे खूप ट्रोल करण्यात आले आहे.
Such a low level Prakash Ji!
Even lower than the Voting Percentage you got in the 2019 elections. https://t.co/dFLDVcEmTd— Rupali Ganguly (@TheRupali) May 23, 2025
