37 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरक्राईमनामापरमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर

परमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर

Google News Follow

Related

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिना शंभर कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, अशी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणात पुरते बदनाम झालेल्या गृहमंत्र्यांनी, याबद्दलचे प्रसिद्धी पत्रक काढून हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याशिवाय या पत्रकात अब्रुनुकसानिचा खटला दाखल करत असल्याचे देखील म्हटले होते. याबरोबरच हे आरोप षडयंत्र असल्याचे देखील त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अंबानींच्या घरासजवळील स्फोटकांचे प्रकरण, यात पुरत्या बदनाम झालेल्या गृहखात्यावर आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या एका पत्राद्वारे जोरदार घाव घातला होता. गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला शंभर कोटी रुपयांची खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिले होते असा आरोप या पत्रातून करण्यात आला होता. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.

हे ही वाचा:

खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूला वेगळे वळण देण्यासाठी गृहमंत्र्यांचा दबाव – परमबीर सिंह

अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर काव्यात्मक निशाणा

या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी बचावार्थ एक प्रसिद्धी पत्रक काढले असून या पत्रकात, परमबीर सिंग यांनी केलेले हे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र म्हटले आहे. हे आरोप खोटे आहेत असा दावा देखील या पत्रातून करण्यात आला आहे. त्याबरोबरच ‘सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? तेव्हाच त्यांनी तोंड का उघडले नाही?’ असा सवाल देखील केला आहे. त्याबरोबरच आपली बदली केली जाणार असल्याचे कळल्यानंतर त्यांनी मुद्दाम त्यांनी एसीपी श्री. पाटिल यांच्याकडून त्यांना अपेक्षित असलेले वदवून घेतले असे देखील गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील ते म्हणाले. परमबीर सिंग यांनी व्हॉट्सअपवर पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला असे या पत्रकात म्टले आहे. या पत्रकाद्वारे परमबीर सिंह यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

पत्रकाच्या शेवटी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा तपास भरकटविण्याच प्रयत्न असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा बैठक आणि कांग्रेसची नाराजी

दरम्यान महाराष्ट्रात हे पत्रयुद्ध चालू असतानाच दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील तातडीने या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार हे अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे यापूर्वी देखील बोलले गेले होते त्याबरोबरच आता काँग्रेस देखील अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याचे समजत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा