30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरक्राईमनामाआर्यन खानला पाळाव्या लागणार 'या' १४ अटी

आर्यन खानला पाळाव्या लागणार ‘या’ १४ अटी

Related

आर्यन खानला काल जामीन मिळाला असला तरी त्याला अनेक अटी पाळाव्या लागणार आहेत. आर्यन खान पोलिसांना माहिती दिल्याशिवाय मुंबई सोडू शकत नाही आणि त्याला दर शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो समोर हजर राहावे लागेल. असे न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्याच्या जामिनासाठी १४ अटी घालण्यात आल्या आहेत.

शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खान याला काल मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आदेशानुसार, त्याला ₹१ लाखाचा वैयक्तिक बाँड सादर करावा लागेल आणि त्याचा पासपोर्ट जमा करावा लागेल.

परवानगीशिवाय देश न सोडणे, ‘ज्या गोष्टीचे आरोप आहेत त्या गोष्टींमध्ये  सहभागी न होणे, त्याचा मित्र अरबाज मर्चंट सारख्या इतर आरोपींशी संवाद न साधणे आणि मीडियाशी संवाद न साधणे या अटींचा समावेश आहे.

आर्यन खानला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात जावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीस हजर राहावे लागणार आहे आणि आवश्यकतेनुसार तपासात सहभागी व्हावे लागणार आहे.

यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबी जामीन रद्द करण्याची विनंती करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी एका क्रूझ शिप पार्टीवर ड्रग्जच्या धाडीनंतर अटक करण्यात आली होती. तो तीन आठवड्यांपासून मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे.

हे ही वाचा:

गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला विशेष अंमली पदार्थ विरोधी न्यायालयात जावे लागेल आणि सुटकेचा आदेश जारी करण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी लागेल.

आर्यन खान आज संध्याकाळी बाहेर पडू शकतो. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, “आम्ही आमच्या जामीनासह तयार आहोत. आम्हाला उच्च न्यायालयाकडून आज आदेशाची प्रत मिळण्याची आशा आहे. ती मिळाल्यावर आम्ही ती सर्व आवश्यक कागदपत्रांसह विशेष एनडीपीएस न्यायालयात सादर करू.” असे आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,511अनुयायीअनुकरण करा
4,870सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा