28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामाशाहरुख खानचा मुलगा क्रूझ छापाप्रकरणी ताब्यात?

शाहरुख खानचा मुलगा क्रूझ छापाप्रकरणी ताब्यात?

Related

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर रंगलेल्या पार्टीत  केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ (ड्रग्स) जप्त करण्यात आले असून आठ जणांना पथकाने ताब्यात घेतले आहे. या पार्टीमधील उपस्थितांपैकी बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव समोर आले आहे. एनसीबीचे पथक सध्या त्याची चौकशी करत आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे जाणाऱ्या क्रूझ मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असून भरसमुद्रात रेव्ह पार्टी सुरू होणार आहे, अशी माहिती एनसीबीला मिळाली होती. समुद्रात छापा टाकून इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्याची ही एनसीबीची पहिलीच मोहीम होती. कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या आठही जणांची चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग

अफगाणिस्तान सीमेवर आत्मघातकी हल्लेखोर तैनात

एनसीबीच्या ताब्यात बॉलीवूड अभिनेत्याचा मुलगा?

तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका

पार्टीमध्ये आपल्याला पाहुणा म्हणून बोलावले होते, त्यसाठी कोणतेही पैसे दिले नसल्याचे, शाहरुखच्या मुलाने चौकशी दरम्यान सांगितले. त्याच्या नावावरून अनेक जणांना पार्टीसाठी बोलावले असल्याचेही त्याने एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितले. पार्टीमधील एक व्हिडीओ हाती लागला असून त्यात आर्यन खान दिसत आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून रोलिंग पेपर मिळाल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून समजली आहे.

एनसीबीचे पथक क्रूझवर होणाऱ्या पार्टीवर नजर ठेवून असताना भरसमुद्रात क्रूझ दाखल होताच हळूहळू पार्टीला रंग चढू लागला. या पार्टीत मोठ्या प्रमानात ड्रग्स घेतले जात असल्याचे कळताच एनसीबीने रंगलेल्या पार्टीत छापा टाकून अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करून एकाला ताब्यात घेतले. हे क्रूझ शनिवारी मुंबईतून गोवा च्या दिशेने निघून पुन्हा सोमवारी मुंबईत बंदरात दाखल होणार होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा