26 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरक्राईमनामाआर्यन खानसह तिघांना राहावे लागणार एक दिवस कोठडीत

आर्यन खानसह तिघांना राहावे लागणार एक दिवस कोठडीत

Google News Follow

Related

शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याच्यासह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. पण त्यांच्यासह आता उर्वरित पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नूपुर सतिजा,इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा, आणि विक्रांत चॉकर अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे. या पाचही जणांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आर्यन खान आणि इतर दोघे असे तिघांना आज सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन्ही आरोपी आणि एनसीबीची बाजू एकूण तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे.

सोमवारी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन आणि इतर दोघे यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून तिघांना न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता असून तिघांना जामीन देखील मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

हे ही वाचा:

निर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..

सोसायटीतील ‘सीसीटीव्हीं’नीच केली चोरी…वाचा!

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

सोमवारपासून विद्या येई घमघम…

 

त्याआधी, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्यासह ३ जणांना एनसीबीने अटक केली. एनडीपीएस ऍक्टच्या ८सी, २० बी, २७ आणि ३५ या भारतीय दंड विधान कलमाखाली आर्यन आणि इतर दोघांना ही अटक करण्यात आली आहे.

इतर ४ जणांची चौकशी सुरू असून त्यांना देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी दिली होती. शेवटी त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आर्यन याच्याकडे सापडलेल्या ड्रग्सबाबत त्याने एनसीबीकडे कबुली दिली असल्याचे समजते. त्याच्याकडे सापडलेले ड्रग्स हे सेवन करण्यासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा