29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामाडोंबिवलीत रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह; अपघात की खून?

डोंबिवलीत रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह; अपघात की खून?

Google News Follow

Related

ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवली शहराचे नाव पुन्हा गुन्हेगारीमुळे चर्चेत आले आहे. रस्त्यावर रिक्षा थांबवून त्यातील प्रवाशांवर चोरट्यांनी चाकूने वार करून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्यावर घडली असून या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा प्रवासी जखमी झाला आहे. संबंधित प्रकरणाची तपासणी टिळकनगर पोलीस व लोहमार्ग पोलीस करत आहेत.

बेचनप्रसाद आणि बबलू हे दोघेही पूर्वेतील शेलारनाका परिसरात भाड्याने राहत होते. फर्निचरच्या दुकानात काम करणारे दोघेही सोमवारी (४ ऑक्टोबर) मध्यरात्री १.३० च्या गाडीने उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यासाठी त्यांनी शेलारनाका येथून रिक्षा पकडली. रेल्वे समांतर रस्त्यावरून जात असताना काही व्यक्तींनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना रिक्षाबाहेर काढत रिक्षाचालकाला पळवून लावले. अज्ञात व्यक्तींनी बेचनप्रसाद आणि बबलू दोघांनाही चाकूच्या धाकाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या ठाकुर्ली- कल्याण दरम्यानच्या रेल्वे रुळाच्या ठिकाणी नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने हल्ला केला तेव्हा बबलू याने स्वतःची सुटका करून तेथून पळ काढला, तर बेचनप्रसाद मात्र त्यांच्या तावडीत सापडला. जखमी अवस्थेतील बबलूने ही माहिती पहाटेच्या सुमारास शेलारनाका गाठत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना दिली.

हे ही वाचा:

क्रूझवर पार्टीला परवानगी; मात्र रांगोळी, गरब्यावर बंदी

उलगडते आहे शेतकरी आंदोलनाचे खरे रूप

नवी मुंबईतील तलावाला धुतलेल्या कपड्यांची झालर

काय घडले चन्नी-शहा भेटीत?

कांबळे यांनी बबलूला घेऊन टिळकनगर पोलीस गाठले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रेल्वे रुळाजवळ बेचनप्रसाद याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या घडली असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी बेचनप्रसाद याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळला असल्याने त्याची हत्या झाली की अपघात याचा पोलीस शोध घेत आहेत. रस्त्यावरील सीसीटीव्हीची मदत यात होते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा