34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामामंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा जवळचा असल्याची बतावणी करत फसवणुकीचा प्रयत्न

Google News Follow

Related

राज्यातील काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा जवळचा असल्याची बतावणी करत भाजपच्या आमदारांना गंडवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांत एका व्यक्तीने काही भाजपा आमदारांना फोन केले होते. आपण जे पी नड्डांच्या जवळचे आहोत, असे सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याने प्रयत्न केला होता. दरम्यान, नागपूर मध्यचे भाजपा आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या भामट्याने ७ मे रोजी संपर्क साधला होता. मात्र, त्याच्या बोलण्यावरून कुंभारेंना संशय आला आणि त्यांना खात्री होताच त्यांनी पोलिसांत या प्रकरणी लेखी तक्रार दिली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड याला गुजरातच्या मोरबीमधून अटक केली आहे.

हे ही वाचा:

आसामच्या वादग्रस्त ‘लेडी सिंघम’चा अपघाती मृत्यू

‘द केरला स्टोरी’मध्ये द्वेषयुक्त भाषण; प. बंगाल सरकारचा दावा

‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

प्रकरण नेमकं काय?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही त्यावरून राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देतो, असं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न केले जात होते. त्यानं गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भाजपा आमदारांना संपर्क साधून तो भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याची बतावणी केली आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असं सांगून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली. नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून उशिरा ताब्यात घेतलं असून त्याचं नाव नीरज सिंह राठोड आहे.

नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला नागपुरात आणले जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा