30 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामाकर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

हत्येनंतर मंगळुरूमध्ये तणावाचे वातावरण

Google News Follow

Related

कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सुहास शेट्टी असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या हत्येशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला असून या व्हिडिओमध्ये काही लोक धारदार शस्त्राने एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहेत. तर, आजूबाजूला लोक उभे राहून ही घटना पाहत होते.

मंगळुरूमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांची हत्या झाली असून या हत्येनंतर मंगळुरूमधील वातावरण बिघडण्याच्या भीतीने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की सुहास यांच्यावर फैजल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. भाजपा कार्यकर्ते प्रवीण नेत्रौ यांच्या हत्येनंतर फैजलची हत्या करण्यात आली होती. आता एनआयए प्रवीण नेत्रौ यांच्या हत्येचाही तपास करत आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या हत्येनंतर मंगळुरूमधील परिस्थिती बिकट झाली असून तणावाचे वातावरण आहे. कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी पोलिसांनी आधीच सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. सुहास शेट्टी यांचे पार्थिव ज्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे त्या रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप खासदार नलिन कुमार कटील सध्या रुग्णालयात उपस्थित आहेत.

हे ही वाचा : 

बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं

फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

हाफिझ सईदसाठी पाकिस्तान एकवटला, दिली चार पट सुरक्षा!

आम्ही सज्ज! शत्रूला INS सूरतच्या कमांडिंग ऑफिसरचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री ८.२७ वाजता शेट्टी पाच जणांसह कारमधून जात असताना हा हल्ला झाला. त्यांच्या गाडीला इतर दोन कारने अडवले, ज्यामधून पाच ते सहा हल्लेखोर बाहेर आले. त्यानंतर शेट्टीवर तलवार आणि इतर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आणि नंतर ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या एजे रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते जमले, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा